शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कॅनमधील थंड पाण्याच्या बेकायदा धंद्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By संतोष भिसे | Updated: May 14, 2024 18:47 IST

संतोष भिसे सांगली : उन्हाचा पारा वाढेल, तशी कॅनमधील थंडगार पाण्याची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. सांगली , मिरजेत ...

संतोष भिसेसांगली : उन्हाचा पारा वाढेल, तशी कॅनमधील थंडगार पाण्याची मागणी प्रचंड वाढू लागली आहे. सांगली, मिरजेत दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची विक्री होते; पण या व्यवसायावर आरोग्याच्या दृष्टीने कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा व्यवसाय लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा धंदा ठरला आहे.प्रत्येक लग्नसोहळ्यात, सार्वजनिक कार्यक्रमात कॅनमधील पाणी पुरविले जाते. मिनरल वॉटरच्या नावाखाली कॅनमधील थंड पाणी डोळे झाकून पिले जाते. सांगली, मिरजेत असे किमान २०० हून अधिक आरओ प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्यावर महापालिका, अन्न व औषध प्रशासन किंवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाचे नियंत्रण नाही. सीलबंद पाण्याच्या बाटलीचे उत्पादन आणि विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे; पण खुल्या पाण्याच्या विक्रीवर नियंत्रण कोणाचे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, भारतीय मानक ब्युरो, वैधमापनशास्त्र विभाग आणि अन्य सरकारी विभाग यापैकी कोणीच जबाबदारी घेत नाही. त्यामुळे असे आरओ प्रकल्प गल्लोगल्ली फोफावले आहेत. चांगल्या नफ्यामुळे त्यांची संख्या भरमसाट वाढत आहे. बहुतांश प्रकल्पांत कोणत्याही प्रक्रियेविना विहीर किंवा कूपनलिकेचे पाणी वापरले जाते. थंड करून कॅनमधून ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. २० लिटर पाण्याचा कॅन ३० ते ४० रुपयांना विकला जातो. त्यातून महापालिका क्षेत्रात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. सांगलीत महापालिकेच्या पाण्याच्या शुद्धतेविषयी वर्षानुवर्षे ओरड आहे. त्यामुळे नागरिकांचा कल कॅनमधील पाण्याकडे आहे. प्रत्यक्षात अनेक व्यावसायिक महापालिकेचेच पाणी थंड करून ग्राहकांच्या गळ्यात मारतात.

कॅनमधील पाण्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतात- पाण्याच्या शुद्धतेची हमी काय?- मानकानुसार ते थंड केले जाते का?- त्याचा पीएच तपासला जातो का?- कॅन खाद्यवस्तूंच्या निकषातील प्लास्टिकचे असतात का?- कूपनलिकेतील पाण्याच्या शुद्धतेची हमी काय?- शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले पाणी मिळते, ही फसवणूक नाही का?

सरकारी कार्यालयांतच पाण्याचे कॅनलोकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या अनेक सरकारी कार्यालयांतच कॅनमधून पाणी मागविले जाते. स्वच्छ दिसते म्हणून नागरिकही डोळे झाकून पितात; पण त्यातून अनेकांना पोटाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे.

कॅनमधील पाण्याच्या विक्रीशी आमच्या विभागाचा संबंध येत नाही. त्याचे परवाने किंवा अन्य कोणतीही बाब आमच्या विभागांतर्गत नाही. - निलेश मसारे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 

नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा ही शासनाची जबाबदारी आहे. आरओ प्रकल्पातील पाण्याच्या शुद्धतेविषयी शासनाने निश्चित धोरण ठरवायला हवे. एखाद्या सक्षम विभागाकडे जबाबदारी द्यायला हवी, तरच ग्राहकांची फसवणूक टळेल. - सुरेश हराळे, माहिती अधिकार कार्यकर्ता, मिरज

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी