शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत कमान न बांधल्यास पुन्हा तीव्र आंदोलन, बेडगप्रश्नी आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:33 IST

बेडग ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील स्वागत कमानीविरोधात ठरावाच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येत्या दहा दिवसांत कमानीचे प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास पुन्हा एकदा माणगाव ते मंत्रालय असा लॉगमार्च काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या माेर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बेडग (ता. मिरज) येथे स्वागत कमान उभारण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात ग्रामसभा घेऊन यावर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार झालेल्या ग्रामसभेत कोणत्याच महापुरूषांची स्वागत कमान न करण्याचा ठराव घेण्यात आला. या ग्रामसभेवर गावातील आंबेडकरी समाजाने बहिष्कार टाकला होता.या ठरावाचा निषेध करण्यासाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले व मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

येत्या दहा दिवसांत बेडग येथील स्वागत कमानीचे काम सुरू न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यात यापूर्वी गावातून आंबेडकरी समाज घरातून बाहेर पडले होते. आताही सर्व समाजाच्या वतीने लाँगमार्च काढण्याचा इशारा देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणगाव येथून आता लाँगमार्च काढत मंत्रालयावर धडक मारण्यात येणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही गावचे सरपंच आणि इतर पदाधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसतील तर याबाबत फडणवीस यांनीच यावर आदेश द्यावेत, असेही यावेळी आंदोलकांनी मागणी केली.

जिल्ह्यातील व मिरज तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात आला. डॉ. महेशकुमार कांबळे यांच्यासह सर्व संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बेडग ग्रामपंचायत बरखास्त कराजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे आदेश दिले. कोणाच्या दबावाखाली हा निर्णय देण्यात आला याची चौकशीची मागणी करत बेडग येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्याचीही मागणी यावेळी कांबळे यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज