शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्या टिकवायच्या असतील, तर यंदाही उन्हाळी सुटी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 10:53 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फक्त सहा दिवसच रजा, दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही मिळणार नाही पुरेशी सुटी.

सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यावर्षीही उन्हाळी सुटी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल सुटीसंदर्भातील आदेश शुक्रवारी जारी केले. त्यानुसार सेविका व मदतनीसांना प्रत्येकी फक्त सहा दिवसांची सुटी मंजूर केली आहे.

कोरोना काळात दोन वर्षे कर्मचाऱ्यांना सुटी मिळाली नव्हती. यावर्षी नियमित सुटीमध्ये दोन वर्षांतील बुडालेल्या सुट्यांचाही समावेश करून किमान १५-२० दिवसांच्या सुटीची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती; पण शासनाने फक्त सहा दिवसच सुटी दिली आहे.

पत्रात म्हटले आहे की, कोरोना काळात अंगणवाड्या बंद होत्या. कोरोनानंतर नुकत्याच पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. या स्थितीत लगेच सुट्या देणे संयुक्तिक होणार नाही. मदतनीसांना २ ते ८ मेदरम्यान आणि सेविकांना ९ ते १५ मेदरम्यान सुटी घेता येईल. मुलांना वर्षभरात किमान ३०० दिवस आहार वाटप गरजेचा असल्याने सुटी घेता येणार नाही. या निर्णयाने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. कोरोनाकाळात अंगणवाड्या बंद असल्या तरी कामे सुरूच होती. कोरडा शिधावाटप, मुलांचे वजन घेणे व अन्य आरोग्यविषयक कामे सुरू होती. ती बेदखल करीत यावर्षी सुटीवर गंडांतर आणले आहे.

सुटी टाळा, नोकऱ्या टिकवामुले खासगी शाळांत जाऊ नयेत, सरकारी अंगणवाडीतच यायला हवीत, असा प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. अंगणवाड्या बंद राहिल्या, तर मुले खासगीमध्ये प्रवेश घेण्याची भीती आहे. त्यामुळे अंगणवाड्या सुरूच ठेवा, प्रवेश वाढवा आणि नोकऱ्या टिकवा, असे अप्रत्यक्ष फर्मान शासनाने जारी केले आहे.

उन्हाळ्यात पालक परगावी जात असल्याने अंगणवाडीत पुरेशी उपस्थिती नसते. गेली दोन वर्षे कर्मचाऱ्यांनी कोरोना साथीविरोधात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. याची दखल घेऊन यावर्षी किमान १५ दिवसांची सुटी आवश्यक आहे; पण प्रशासनाने मनमानी निर्णय घेतला आहे.- रेखा पाटील, जिल्हाध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी महासभा

टॅग्स :Sangliसांगली