शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

इचलकरंजी पालिका : दोन्ही आघाड्यांतील बंडखोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:54 IST

नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून

ठळक मुद्देविषय समित्यांची निवडणूक, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का

राजाराम पाटील ।इचलकरंजी : नगरपालिका विविध विषय समित्यांच्या शनिवारी (दि.५) झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांमध्येही बंडखोर असल्याचे उघडकीस आले. लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व असतानाच ही बंडखोरी दिसून आली. त्यामुळे दोन्ही आघाडीचे प्रमुख आणि घटक पक्षांचे नेते यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप व ताराराणी आघाडी यांची युती होती, तर राष्टÑीय व राष्टÑवादी कॉँग्रेस आणि शाहू विकास आघाडी यांची एकत्रितपणे आघाडी होऊन या निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. ६२ नगरसेवक असलेल्या इचलकरंजी पालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉँग्रेसचे १८, राष्टÑवादी कॉँग्रेसचे ७, शाहू विकास आघाडीचे ११, भाजपचे १५ व ताराराणी आघाडीचे ११ असे नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीनंतर मात्र राष्टÑवादी कॉँग्रेसने भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांची आघाडी सत्तेवर आली.

सत्तारूढ आघाडी सत्तेवर येत असताना उपनगराध्यक्षपदासह विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांचा वाटप करणारा ‘फॉर्म्युला’ ठरला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी ‘फॉर्म्युल्या’त बदल करून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बांधकाम व पाणीपुरवठा या दोन समिती आपणाकडेच कायम राहाव्यात, असा आग्रह धरला आणि यातूनच वाद निर्माण झाला; पण सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार सुरेश हाळवणकर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रवादीकडेच या दोन समित्या ठेवण्यावर आघाडीमध्ये एकमत घडवून आणले.

शनिवारी झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये बांधकाम व पाणीपुरवठा या दोन्ही समित्या आपणाकडे आणखीन एक वर्ष राहाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केल्यामुळे पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटली आणि ताराराणी आघाडीने नाराजी व्यक्त केली. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रचंड घडामोडी घडल्या. सायंकाळपर्यंत कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर राष्टÑवादी कॉँग्रेसने घरोबा करण्याचे संकेत दिले. सायंकाळी मात्र यामध्ये पुन्हा बेबनाव निर्माण होऊन कॉँग्रेस व शाहू आघाडीबरोबर ताराराणी आघाडी एकत्रित येऊन सत्ता काबीज करण्याचे ठरले.

मध्यरात्रीपर्यंत नव्याने होणाºया या आघाडीमध्ये सत्तावाटपाचा ‘फॉर्म्युला’ही ठरला. पण, मध्यरात्रीनंतर सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार हाळवणकर यांनी प्रत्यक्ष सहभागास सुरुवात केली तसेच यामध्ये काही नगरसेवकांनीही आघाडी घेतली आणि भाजप, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस यांचे असलेले गठबंधन अबाधित ठेवण्यामध्ये यश मिळविले. अशा प्रकारे सत्तारूढ आघाडी, त्याचबरोबर विरोधी आघाडी आहे त्या स्थितीमध्ये राहिली असली तरी यावेळी मात्र दोन्हीकडेही बंडखोरीची बाधा झाल्याचे दिसून आले. लोकसभा व विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच निवडणुका होणार आहेत म्हणून आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.‘ताराराणी, कॉँग्रेस व शाहू’मध्ये बंडखोरीसमित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत होत्या, त्यामध्ये दोन्हीही आघाड्यांमध्ये अस्थिरता आली होती. अशा स्थितीत राष्टÑीय कॉँग्रेसमध्ये १८ पैकी सुमारे दहाजण, ताराराणी आघाडीमध्ये १० पैकी पाचजण आणि शाहू आघाडीमध्ये ११ पैकी सहाजण बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर भाजपमध्येसुद्धा नाराजी दिसून आली. काही नगरसेवक आणि नगरसेविका सभागृहामधूनच उठून गेल्याचे दृश्य दिसत होते.आघाडीच्या नेतृत्वाबरोबरच पाचही घटक पक्षांच्या प्रमुखांनी आत्मचिंतन करून आपापल्या नगरसेवकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर