शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस

By संतोष कनमुसे | Updated: June 13, 2025 13:11 IST

सांगलीत २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याबद्दल महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. या प्रकरणात आता आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांचे नावही समोर आले आहे.

काही दिवसापूर्वी सांगलीत ७ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महापालिकेचे उपायुक्त वैभव विजय साबळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. आता या लाच प्रकरणात प्रकरणात तत्कालीन आएएस अधिकारी शुभम गुप्तांचे नाव पुढे येत आहे. या प्रकरणी त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला

आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांचे अनेक नवीन कारनामे आता समोर आले आहेत. यामुळे गुप्ता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याआधी शुभम गुप्ता गडचिरोली येथे सेवेत होते. यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. यानंतर त्यांची बदली सांगली येथे झाली. गुप्ता प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाच्या अंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली. या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

सांगलीत बदलीनंतर नवीन कारनामे

शुभम गुप्ता यांनी सांगलीत पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसातच त्यांनी अनेक वादग्रस्त प्रकरण हाताळली. यावेळी सांगलीतील खासदार विशाल पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी गुप्ता यांची सांगलीमधून तडकाफडकी बदली झाली होती, महापालिका क्षेत्रातील आरक्षित जागा संपदानाचा जो विषय आहे त्याबाबतीत सुद्धा आयुक्त गुप्ता यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप झाले आहेत. त्यांनी भूमी संपादनाबाबत कोट्यवधी रुपये संशयास्पद रित्या मूळ मालकाला न देता वट मुक्तानंदरांना पैसे देऊन त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.  

२०० ते २५० कोटींच्या ठेवी खासगी बँकेत ठेवल्या

सांगलीतील लाच प्रकरणी आम्ही सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी सतीश साखळकर म्हणाले," महापालिकेच्या आर्थिक ठेवी होत्या त्या नॅशनल बँकेत होत्या. पण , गुप्ता सांगलीत रुजू  झाल्यानंतर जवळ जवळ २०० ते २५० कोटी रुपयांच्या ठेवी या प्रायव्हेट बँकेत ठेवल्या. गुप्ता यांनी महापालिकेच्या आपत्कालीन फंडातून स्वत:साठी गाडी खरेदी केली होती. सांगलीत आल्यापासून त्यांनी भ्रष्टाचाराला सुरुवात केली होती. ते कोणाचेच ऐकत नव्हते, त्यांचा कारभार मनमानी होता,  मक्तेदारांचे चेक काढण्यासाठी १५ ते १७ टक्के पर्यंत टक्केवारी घेऊन ठेकेदारांचे चेक काढत होते, असा आरोपही सतीश साखळकर यांनी केला.    

लाच प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी

दरम्यान, २४ मजली इमारतीच्या परवानगीसाठी ७ लाख रुपयांची लाट मागितल्या प्रकरणी वैभव साबळे यांना अटक केली. आता तक्रारादार तानाजी रूईकर यांनी आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांच्यावर आरोप केले. गुप्ता यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. तक्रारादार तानाजी रूईकर म्हणाले, शुभम गुप्ता यांना आम्ही वारंवार परमिशनची फाईल पूर्ण करुन द्या म्हणून सांगत होतो. आम्हाला तो प्रोजेक्ट लवकरात लवकर चालू करायचा होता. त्या प्रोजेक्टमधून महापालिकेला २ कोटी रुपये शासनाची फि म्हणून भरावी लागणार होती. असं असताना देखील शुभम गुप्ता यांनी वारंवार तुटपुंज्या कारणासाठी फाईल खाली पाठवण्याचा प्रयत्न केला, पैसे मागण्याच्या हेतूने त्यांनी फाईल मागे दिले. यामुळे या प्रकरणात त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केली, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरण