शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मी जनतेतून लढूनच विधानसभेत जाणार, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा निर्धार

By अशोक डोंबाळे | Updated: July 16, 2024 16:48 IST

विधान परिषदेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला पूर्ण विराम दिला

सांगली : सांगलीविधानसभा निवडणूक मी जनतेतूनच लढवणार आहे. काँग्रेस नेत्यांना व प्रदेश पदाधिकाऱ्यांना तसे स्पष्टपणे सांगितले आहे. पक्षाकडे उमेदवारीही मागितली असल्याचे सांगत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला पूर्ण विराम दिला आहे. जयश्रीताई पाटील यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.चिंतामणीनगर येथील मदनभाऊ युवा मंचतर्फे वृक्षारोपणानंतर जयश्रीताई पाटील बोलत होत्या. काँग्रेस नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाची सुरुवात चिंतामणीनगर येथे १०० झाडे लावून करण्यात आली. यावेळी सावली निवारा केंद्रातील बेघर उपस्थित होते.जयश्रीताई पाटील यांनी जनतेच्या पाठिंब्यावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर यंदा सांगली विधानसभा निवडणूक मी जनतेतूनच लढविणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जयश्रीताई पाटील यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे इच्छुक आहेत. पृथ्वीराज पाटील यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या विरोधात जोरदार लढत दिली होती. त्यांचा त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला. गेल्या पाच वर्षांपासून ते पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष ..आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. सांगली लोकसभेला विशाल पाटील व विधानसभेला पृथ्वीराज पाटील हे जवळपास ठरले होते. गेल्या वर्षभरापासून याची चर्चाही होती. जाहीर कार्यक्रमातून पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवाराबाबत काँग्रेस नेत्यांकडून संकेतही दिले जात होते. मात्र, आता सांगली विधानसभा निवडणूक लढण्याची भूमिका जयश्रीताई पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसPoliticsराजकारण