शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जत्रा आली म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही - खासदार संजय पाटील

By अविनाश कोळी | Updated: June 3, 2023 20:46 IST

आम्ही दोघे एकत्र असल्याने यंदा ९ लाखावर मताधिक्य जाईल, असा दावा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. 

सांगली : जत्रा आली म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही. आमची तयारी कायम सुरुच असते. मागील लोकसभा निवडणुकीत मला ६ लाखावर मते मिळाली होती. आ. गोपीचंद पडळकरांना तीन लाखाच्या घरात मते होती. आम्ही दोघे एकत्र असल्याने यंदा ९ लाखावर मताधिक्य जाईल, असा दावा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले की, काँग्रेसकडून लोकसभेची तयारी सुरु असली व त्यांचा उमेदवार ठरला तरी त्याचा आम्ही विचार करणार नाही. कोणीही आले तरी यावेळी मताधिक्यात मोठी वाढ दिसेल. काही पैलवान जत्रा आली की व्यायाम करायला सुरुवात करतात. आमचा कायमचाच सराव असतो. ते म्हणाले की, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत वीजबिलावर होणारा मोठा खर्च टाळण्यासाठी २०० मेगावॅटचा चौदाशे कोटी रुपयांचा वीज प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केला आहे. 

त्याचबरोबर म्हैसाळच्या विस्तारीत योजनेसही मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या दोन्ही योजनांचे भूमीपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. राज्य शासन विस्तारीत प्रकल्पासाठी ९७२ कोटी रुपये देणार आहे. विस्तारीत योजनेमुळे पाण्यापासून वंचित जत तालुक्यातील ६५ गावांना लाभ मिळेल.

सौर वीज प्रकल्पासाठी २०२१ मध्ये प्रस्ताव दिला होता. एका आंतरराष्ट्रीय लेखपरीक्षण संस्थेमार्फत योजनेचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर सौर प्रकल्पास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. २४ ते २६ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल. ही योजना वीजेबाबत स्वयंपूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलाचा भार सोसावा लागणार नाही. या कामासाठी लवकरच वर्कऑर्डर दिली जाईल.

महापालिका निवडणुकीत लक्ष घालणारमहापालिका निवडणूक जवळ आल्या आहेत. खासदार म्हणून मी या निवडणुकीत लक्ष देणार आहे. पक्षानेही जबाबदारी दिलेली आहे, असे संजय पाटील म्हणाले.

टेंभू योजनेसाठीही प्रस्ताव देऊम्हैसाळ योजनेप्रमाणे टेंभू उपसा सिंचन योजनाही सौरउर्जेवर चालविण्यासाठी प्रस्ताव दिला जाईल. त्याचाही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्व्हे केला जाईल. जिल्ह्यातील सर्व योजना सौरउर्जेवर चालल्या तर शेतकऱ्यांना त्या परवडतील, असे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Sangliसांगली