शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जतचा द्राक्षबागायतदार दुष्काळामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:36 IST

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. या द्राक्षबागा शेतकरी काढून टाकत आहेत. द्राक्ष बागांचे सांगाडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. शेतकरी शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अ‍ॅँगल्सची विक्री करू लागला आहे.

ठळक मुद्देजतचा द्राक्षबागायतदार दुष्काळामुळे हवालदिलबागेचे फक्त सांगाडेच शिल्लक

गजानन पाटीलसंख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. या द्राक्षबागा शेतकरी काढून टाकत आहेत. द्राक्ष बागांचे सांगाडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. शेतकरी शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अ‍ॅँगल्सची विक्री करू लागला आहे.बागायतदार शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिल्याने अक्षरश: शेतकरी देशोधडीला लागला आहे. बॅँका, खासगी सावकार, विकास सोसयट्यांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होत आहे.तालुक्याच्या ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरचे शेततलाव बांधले आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्याखाण बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.यावर्षी पाऊसच झाला नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व दक्षिण भागातील सर्वच्या सर्व तलाव व दोन मध्यम प्रकल्प पाण्याअभावी डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले आहेत. तालुक्यातील २६ तलावांपैकी १८ तलाव कोरडे पडले आहेत. २ मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृतसंचयखाली आली आहे. तलावातील पाणीसाठा ४ टक्के शिल्लक आहे. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. विहिरी व कूपनलिका खोदल्या तरीसुध्दा पाणी लागत नाही. द्राक्ष उत्पादनासाठी मार्च-एप्रिल महिन्यामध्ये बागांना पाणी जास्त लागते.डिसेंबर महिन्यापासून कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. चार महिन्यांपासून बागांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागा वाळू लागल्या आहेत. टॅँकरने पाणी घालणे परवडत नसल्याने शेतकरी बागा काढून टाकत आहेत. बागेचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अ‍ॅँगल्सची विक्री करण्याची वेळ द्राक्ष बागायतदारांवर आली आहे. 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी