शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो महिलांची ८६ लाखांची फसवणूक, गृहोद्योग कंपनीच्या संचालकांचा पोबारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:41 IST

धाराशिव जिल्ह्यातील दाम्पत्य

सांगली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेकडो महिलांना गंडा घालून एका गृहोद्योग कंपनीने फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. गुरुकृपा महिला गृह उद्योग कंपनी असे तिचे नाव असून दोघा संचालकावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.धाराशिव जिल्ह्यातील एका या कंपनीच्या नावावर ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर (वय ३१, सध्या रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी, १०० फुटी रस्ता, सांगली, मुळ रा. कास्ती खुर्द, ता. लोहारा, जि. धाराशिव) आणि त्याची पत्नी कविता लक्ष्मण बंडगर उर्फ कविता राजकुमार शिंदे (वय २५, मुळ रा. सोन्याळ, ता. जत, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात चंद्रकांत महादेव कडोले (वय ५९, रा. प्रगती कॉलनी, सांगली) यांनी पोलिसांत धाव घेतली.बंडगर दाम्पत्याने सांगलीत काही महिन्यांपूर्वी गुरुकृपा महिला गृह उद्योग नावाने कंपनी सुरू केली होती. सांगली, मिरज, तासगाव, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांत कंपनीचे ग्राहक तयार केले. सुमारे दीड ते दोन हजार लोकांना सभासद करून घेतले. सभासद होण्यासाठी महिलांकडून १० हजार रुपये अनामत भरून घेतली. त्यातून त्यांना चटणी पँकिंग करण्याचे काम देण्यात आले होते.

काही दिवसांनी हे काम बंद करून उद्योगाने अचानकपणे गाशा गुंडाळला. हे लक्षात येताच पैसे भरलेल्या सभासद महिलांनी अनामतीची १० हजार रुपये रक्कम परत करण्यासाठी बंडगर दाम्पत्याकडे तगादा लावला. पण सध्या दोघेही ८६ लाख २८ हजार ५०० रुपये घेऊन गायब झाले आहेत. त्यांनी सभासद महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

चार पैसे मिळविण्याच्या प्रयत्नात..घर सांभाळतानाच छोटा-मोठा व्यवसाय करुन चार पैसे मिळवावेत आणि संसाराला हातभार लावा अशी मनीषा बाळगून महिलांनी पैसे गुंतविले. बंडगर दांपत्याने त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केली. पोलिसांनी संशयितांना पकडले, तरी महिलांचे पैसे परत मिळणार का? असा सवाल फसवणूक झालेल्या महिलांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिलाfraudधोकेबाजी