शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

किती जणांचीही आघाडी करा, सत्ता आमचीच : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:53 IST

भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत.

सांगली : पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आले तर पुढील पन्नास वर्षे ते सत्तेवरून हलणार नाही, याची खात्री झाल्याने भाजपला पराभूत करण्यासाठी अनेक पक्ष, संघटना एकमेकांचे विचार पटत नसतानाही आघाडी करू पहात आहेत. कितीजणही एकत्र आले तरी भाजपचीच सत्ता केंद्रात व राज्यात येणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला. सांगलीत कर्नाळ रस्त्यावर एका मंगल कार्यालयात भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश हाळवणकर, माजी आमदार दिनकर पाटील, रमेश शेंडगे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.दानवे म्हणाले की, निवडणुका आल्या की आघाड्या होत असतात, मात्र ज्यांचे वैचारिक मतभेद होते ते लोकही आता एकत्र येत आहेत. कधीकाळी महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षाही खालच्या क्रमांकावर असणारा भाजप आता राज्यातील अव्वल पक्ष ठरला आहे. राज्यातील १0 हजार सरपंच, १८ महापालिका, ९0 नगरपालिका, १0 जिल्हा परिषदा आणि २३ खासदारांसह आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. वाढत जाणारी ही पक्षाची ताकद पाहूनच विरोधी गटात अस्वस्थता आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला रोखले नाही, तर पुढील पन्नास वर्षे कोणत्याही अन्य पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.सरकारचे हे यश चांगल्या धोरणांमुळे मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात कधीही गरिबांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना राबविल्या नव्हत्या. राज्यात भाजपने ज्या योजना जाहीर केल्या, त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली. गरिबांच्या कल्याणाचा आमचा अजेंडा यापुढेही कायम राहणार आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे शासनाच्या योजना आणि त्याचा लाभ कसा दिला गेला, याची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता अविश्रांत काम केले पाहिजे. येत्या ३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र भाजपची मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. या रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन स्थानिक लोकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकधनगर आरक्षणासंदर्भात नियुक्त संस्थेचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अधिवेशनात यासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय होणार होता, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन स्थगित करावे लागले. धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावले टाकत आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे