शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

तासगावात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये सामना

By admin | Updated: November 11, 2016 23:38 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी बारगळली : नगराध्यक्ष पदासाठी दहाजण रिंगणात

तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठीचे तीन, तर नगरसेवक पदाच्या तेरा उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. नगराध्यक्ष पदासाठी दहा, तर नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दहा ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे. पाच ठिकाणी चौरंगी, तर सहा ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहे. शेकापचे सहा, शिवसेनेचे पाच, तर नऊ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी नगराध्यक्ष पदावरुन बारगळली. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच तासगावच्या पटावर तिरंगी आणि बहुरंगी सामना पाहायला मिळणार आहे. तासगाव नगरपालिकेसाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि शेकापने तयारी केली होती. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पूर्ण पॅनेल लावून पालिकेचे सत्तासिंंहासन ताब्यात घेण्यासाठी मार्चेबांधणी सुरु केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीबाबत बोलणी सुरु होती. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्षांची चर्चा नगराध्यक्ष पदावरुन पुढे सरकली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेली आघाडी बारगळली. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज दाखल केलेले भाजपचे उमेदवार मोहन कांबळे, राष्ट्रवादीचे जालिंदर कांबळे यांच्यासह स्वाभिमानीचे जितेंद्र कांबळे यांनी अनपेक्षित माघार घेतली. त्यामुळे दहा उमेदवार रिंगणार कायम राहिले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे... अ‍ॅड. संजय सावंत (राष्ट्रवादी), डॉ. विजय सावंत (भाजप), शिवाजी शिंंदे (काँग्रेस), शिवाजी गुळवे (शेकाप), मिथुन कांबळे (शिवसेना), म्हाकू मोरे (रासप पुरस्कृत), रमेश कांबळे (अपक्ष), रमेश सावंत (अपक्ष), रोहित ऐवळे (अपक्ष), मोहन कांबळे (अपक्ष). प्रभागनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे... प्रभाग १ अ : जयश्री माळी (भाजप), निर्मला पाटील (राष्ट्रवादी), शिराज जमादार (काँग्रेस). प्रभाग १ ब : बाबासाहेब पाटील (भाजप), गजानन माळी (शेकाप), दत्तात्रय पवार (काँग्रेस), अभिजित माळी (राष्ट्रवादी). प्रभाग २ अ : पद्मिनी जावळे (राष्ट्रवादी), रेश्मा धोत्रे (भाजप), सुशिला पाटील (कााँग्रेस). प्रभाग २ ब : तानाजी पवार (राष्ट्रवादी),अरुण साळुंखे (भाजप), आनंदा मानकर (काँग्रेस). प्रभाग ३ अ : संगीता माळी (काँग्रेस), पूनम माळी (राष्ट्रवादी), रोहिणी शिरतोडे (भाजप). प्रभाग ३ ब : सौरभ सूर्यवंशी (काँग्रेस), निळकंठ टिंंगरे (राष्ट्रवादी), जाफर मुजावर (भाजप), अक्षय शिंंदे (शिवसेना), संदीप चव्हाण (शेकाप), धनाजी गायकवाड (अपक्ष), किरण बोडके (अपक्ष). प्रभाग ४ अ : फारुक हकीम (काँग्रेस), रामचंद्र माळी (राष्ट्रवादी), किशोर गायकवाड (भाजप), अयाज मुर्सल (अपक्ष). प्रभाग ४ ब : शोभा जाधव (राष्ट्रवादी), उमा कदम (काँग्रेस), मंगल मानकर (भाजप). प्रभाग ५ अ : पूनम सूर्यवंशी (भाजप), धनश्री सूर्यवंशी (काँग्रेस), नलिनी पवार (राष्ट्रवादी). प्रभाग ५ ब : सचिन कोळी (काँग्रेस), अनिल कुत्ते (भाजप), तुकाराम कुंभार (राष्ट्रवादी), प्रमोद दरेकर (शिवसेना), सुभाष खंडागळे (अपक्ष). प्रभाग ६ अ : कमल रसाळ (काँग्रेस), रेहाना मुल्ला (राष्ट्रवादी), शहिदा मोमीन (भाजप). प्रभाग ६ ब : आजम मुल्ला (काँग्रेस), सचिन माळी (भाजप), बाळासाहेब सावंत (राष्ट्रवादी), संतोष सूर्यवंशी (शिवसेना), सुलेमान तांबोळी (शेकाप). प्रभाग ७ अ : ताजुद्दीन मुलाणी (काँग्रेस), संतोष माळी (भाजप), अमोल साळुंखे (राष्ट्रवादी), रोहित माळी (शिवसेना), सुभाष अष्टेकर (अपक्ष). प्रभाग ७ ब : सुनंदा पाटील (भाजप), शोभा पाटील (राष्ट्रवादी), रेखा पाटील (काँग्रेस). प्रभाग ८ अ : वैभव भाट (राष्ट्रवादी), सागर गायकवाड (काँग्रेस), उमेश भाट (भाजप). प्रभाग ८ ब : सुनीता पाटील (काँग्रेस), भारती धाबुगडे (भाजप), प्रतिभा लुगडे (राष्ट्रवादी), मनीषा लुगडे (अपक्ष). प्रभाग ९ अ : विनोद देवकुळे (काँग्रेस), मधुकर देवकुळे (राष्ट्रवादी), सुभाष देवकुळे (भाजप), विलास कांबळे (शेकाप), मिथुन कांबळे (शिवसेना), चतुर कांबळे (अपक्ष). प्रभाग ९ ब : उज्वला पवार (काँग्रेस), दीपाली पाटील (भाजप), अर्चना जाधव (राष्ट्रवादी), पूजा शेळके (शेकाप). प्रभाग १० अ : शुभांगी तासगावकर (काँग्रेस), अनिता कांबळे (राष्ट्रवादी), सारिका कांबळे (भाजप), अलकावती कांबळे (अपक्ष). प्रभाग १० ब : रुपाली गावडे (भाजप), रंजना गावडे (राष्ट्रवादी), स्वाती शिंंदे (काँग्रेस). प्रभाग १० क : सचिन पाटील (राष्ट्रवादी), दत्तात्रय रेंदाळकर (भाजप), किरण जाधव (काँग्रेस), पांडुरंग जाधव (शेकाप), संजीव देवकुळे (आरपीआय). (वार्ताहर) तासगावातील अटीतटीचे दहा प्रभाग... २१ जागांपैकी दहा ठिकाणी मोठी अटीतटीची लढत होत आहे. या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये टशन पाहायला मिळणार आहे, तर अन्य अकरा जागांवर शेकाप, शिवसेनेसह अपक्षांनी बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण केले आहे. या ठिकाणी कोणाची मते कोण खाणार, यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या तीन उमेदवारांना अन्य पक्ष आणि अपक्षांचे आव्हान कितपत राहणार? हे पाहावे लागणार आहे. यातील काही प्रभागात पारंपरिक विरोधकांतच लढतीचे चित्र असून यावेळी बाजी कोण मारणार? हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.