महाडिकांची एण्ट्री
भाजपचे नऊ नगरसवेक गेली दोन दिवस संपर्काबाहेर आहेत. त्यांना शोधण्यासाठी आता सांगलीतील सूर्यवंशी गटाला इस्लामपुरातील महाडिक गटाची ताकद मिळाली आहे. सम्राट महाडिक यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात हजेरी लावत बैठक घेतली.
चौकट
आघाडीच्या नेत्यांची आज बैठक
कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची शनिवारी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावेळी कॉंग्रेसची भूमिका अंतिम होण्याची शक्यता आहे. दोन्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी ही निवडणूक संयुक्तपणे लढणार असून, महापौर व उपमहापौर आमचाच होणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
चौकट
पोलिसांकडून समज
महापौर निवडीवरून भाजप-राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुखांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावून कडक शब्दात कायदा व सुव्यवस्था राखण्याची समज दिली. वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.