शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

युवकांचे आशास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST

राजकीय पक्ष, गट-तट, धर्मभेद बाजूला ठेवून, आपल्याकडे काम घेऊन आलेला कार्यकर्ता आपल्या तालुक्यातील आहे. असे समजून सतत काम करीत ...

राजकीय पक्ष, गट-तट, धर्मभेद बाजूला ठेवून, आपल्याकडे काम घेऊन आलेला कार्यकर्ता आपल्या तालुक्यातील आहे. असे समजून सतत काम करीत असणाऱ्या व कार्यकर्त्यांना आपलेसे करणाऱ्या विक्रमदादांनी अल्पावधीतच जत तालुक्यातील राजकारणात गरुडभरारी घेतली आहे. भारतीय सहकारी बँक, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, जत तालुका अंगणवाडी सेविका व मदतनीस निवड समितीचे सदस्य, धैर्यशील यशवंतराव सावंत पतसंस्था जत व दत्त ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था डफळापूरचे संस्थापक, सांगली प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि अभिविश्व चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने ‘लेक वाचवा अभियान’ या माध्यमातून दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वरील सर्व संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही पदाची व इतर अपेक्षा न बाळगता, काँग्रेस पक्ष तसेच इतर सर्व पक्षांतील सर्वसामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यामुळे जत शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व उमदी जिल्हा परिषद सदस्य, भारती सहकारी बँक, भारती हॉस्पिटल, भारती मेडिकल कॉलेज आदी संस्थांच्या माध्यमातून जत तालुक्यातील दीनदलित, गोरगरीब जनतेला ज्यादा फायदा व्हावा व त्यांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक जीवनमान सुधारावे यासाठी त्यांनी मागील पंचवीस-तीस वर्षांपासून सतत प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम आता जत तालुक्यात दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांचे नाव सतत चर्चेत येऊ लागले आहे. जत तालुक्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना दादा सतत दिलासा देतात. ज्या रुग्णांची उपचार करून घेण्याची व रुग्णालयापर्यंत वाहनातून जाण्याची आर्थिक ऐपत नसते, अशा रुग्णांसाठी ते देवदूत होऊन येतात. कमी खर्चात सर्वाधिक आणि चांगले उपचार करून देण्याचा फायदा जत तालुक्यातील जनतेला त्यांनी मिळवून दिलेला आहे.

पदांची व आर्थिक लाभाची कोणतीही अपेक्षा न बाळगता सतत काम करण्याच्या या त्यांच्या पद्धतीमुळे तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी तालुक्यातील प्रभावी नेतृत्व व युवक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहू लागली आहेत.

दादांना घरातूनच राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. त्यांचे आजोबा सरदार यशवंतराव माधवराव सावंत हे जत संस्थानचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या कार्यकालात संस्थानकडून कोणताही आर्थिक मोबदला घेतला नाही. जनसेवा हेच ध्येय ठेवून त्यांनी समाजसेवा केली. संस्थान विलीन झाल्यानंतर १९६२ ते १९७२ अखेर सलग दहा वर्षे आजोबा व त्यानंतर विक्रम दादांचे चुलते सरदार रामराव यशवंतराव सावंत यांनी १४ जून १९७९ ते ३० जून १९९० अशा सलग ११ वर्षांच्या कालावधीत जत पंचायत समितीचे सभापती म्हणून यशस्वीपणे काम केलेले आहे.

राज्याचे माजी वनमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या सामाजिक विचारावर त्यांचे कार्य सुरू आहे. तसेच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, प्रादेशिक परिवहन समितीचे माजी सदस्य अनंत ऊर्फ बाबा शिंदे, सांगली जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष व आमदार मोहनशेठ कदम आदी मान्यवरांचे त्यांना सतत मार्गदर्शन मिळत आहे. त्याचा उपयोग जत तालुक्याच्या विकासासाठी करण्याचा संकल्प दादांनी हाती घेतला आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान होऊ लागली आहे. जत तालुक्याच्या राजकीय पटलावर दादांचे नेतृत्व उगवते असले तरी, त्यांनी आपल्या कामातून तालुक्यातील जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही दबावाला व आमिषाला बळी न पडता तालुक्‍यातील तरुणांनी विधानसभा निवडणूक प्रचार यंत्रणा हातात घेऊन सुमारे ४० हजार मताधिक्‍याने त्यांना जत विधानसभा मतदार संघातून विजयी केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते व तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापुढील काळातही त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच त्यांच्या वाढदिनी आमची शुभेच्छा..!

चाैकट

नाव - मा. आमदार विक्रमसिंह (दादा) बाळासाहेब सावंत

शिक्षण - बी.कॉम.

जन्मतारीख - ४ फेब्रुवारी १९७२

पत्ता- विजय कॉलनी, मंगळवार पेठ जत, ता. जत जि. सांगली

दूरध्वनी- ९८२२२६७९१९

आवडते नेते - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, मा. डॉ. पतंगराव कदम

छंद - वाचन, जनसंपर्क व समाजसेवा

खेळ - व्हॉलिबॉल व कबड्‌डी

पुस्तक - अग्निपंख (लेखक - माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम)

वैवाहिक जीवन - पत्नी व दोन मुले

चाैकट

भविष्यातील योजना...

जत तालुका विभाजन/त्रिभाजन, तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, बेरोजगारांना रोजगार निर्मिती, गरजूंना माफक दरात व मोफत रुग्णसेवा व अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे, कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित गावांना पाणी उपलब्ध करून देणे.