लोकमत न्यूज नेटवर्क
अंकलखोप :
कोरोना महामारीच्या काळात आपल्यावर पडलेली जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा सेविका हेच खऱ्या अर्थाने कोरोना योद्ध्या आहेत. तुटपुंज्या मानधनात जीवावर उदार होऊन गावातील सर्वांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा कोरोना योद्ध्यांचा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अंकलखोपमध्ये सन्मान करण्यात आला.
कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पलूस-कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसतर्फे आशा सेविकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. यावेळी पलूस-कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसच्या महासचिव प्रणाली पाटील, घनश्याम सूर्यवंशी, शामराव पाटील, उदय पाटील, प्रमोद जाधव, उदयसिंह सूर्यवंशी, कै. डॉ. पतंगरावजी कदम खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रदीप पाटील, सरपंच अनिल विभुते, संतगावच्या सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच विनय पाटील, ग्रा. स. अशोक चौगुले, माणिक सूर्यवंशी, अरविंद सूर्यवंशी, सत्यजित पाटील, प्रणव सूर्यवंशी, अक्षय सावंत आदी उपस्थित होते.