आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील कृषी सहाय्यक सावित्री आटुगडे यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून गौरव करण्यात आला.
‘कृषी संजीवनी मोहीम २०२१’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी सावित्री आटुगडे यांचा सत्कार केला. यावेळी कृषी अधिकारी सारिका पाटील, मंडल कृषी अधिकारी एम. ए. निंबाळकर, एस. टी. खारगे, डी. एल. बामणे, विवेक ननवरे तसेच कृषी पर्यवेक्षक एम. एम. घाडगे, मकरंद कारंजकर उपस्थित होते.
भगवानराव माने म्हणाले, कारंदवाडीसारख्या कृषिप्रधान गावांमध्ये सावित्री आटुगडे यांचे काम अत्यंत उत्कृष्ट असून, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांची माहिती त्या सातत्याने देत असतात.
सावित्री आटुगडे म्हणाल्या, कृषी अधिकारी भगवानराव माने यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सर्वांनी केलेल्या सहकार्याची ही पोचपावती आहे.
फोटो : १६ सावित्री आटुगडे