शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुटीत विद्यार्थी रमणार पुस्तकांच्या विश्वात-: नगर वाचनालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:17 IST

आधुनिक गॅझेट आणि मोबाईलच्या व्हर्च्युअल विश्वात रमणाºया विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी खास मोफत बाल विभाग सुरू

ठळक मुद्दे२५ दिवस हजेरी असणाºयाला मिळणार भेट;वाचनाकडे वळविण्याचा प्रयत्न

सातारा : आधुनिक गॅझेट आणि मोबाईलच्या व्हर्च्युअल विश्वात रमणाºया विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी खास मोफत बाल विभाग सुरू केला आहे. सलग २५ दिवस येथे येऊन एक तास पुस्तक वाचणाºया विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात येणार आहे.

येथील प्रतापसिंह नगर वाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. १५ एप्रिल ते ३१ मे या दरम्यान हा उपक्रम सकाळी ८.३० ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत सुरू असणार आहे. यांतर्गत वाचनालयातच एक स्वतंत्र जागा या बालकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. या जागेत विद्यार्थी त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचन करू शकतात. पुस्तक वाचन झाल्यानंतर त्याविषयीचे मत विद्यार्थ्यांनी एका वहीत लिहिणं अपेक्षित आहे. येथे येणाºया प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरीही वाचनालयाच्या वतीने नोंदविण्यात येत आहे. 

या हजेरी पत्रकानुसार २५ दिवस हजेरी लावणाºया विद्यार्थ्याला एका कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. नगर वाचनालयाच्या वतीने पूर्वी शाहूपुरी, नागठाणे, विलासपूर, शेंद्रे, सदरबझार, अजिंक्य कॉलनी आदी ठिकाणी बालक वाचनालयाची उपकेंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र, या उपक्रेंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे ती बंद करण्यात आली. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाचनालयाच्या या प्रयत्नांना पालकांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुटीतील ‘एक तास वाचनासाठी’ दिला गेला तर समृद्ध आणि वाचणारी पिढी घडेल, यात शंका नाही.  

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन जवळपास संपुष्टात आले आहे. वाचनालयाकडे येणाºया विद्यार्थ्यांची संख्याही दिवसेंदिवस रोडावत आहे. त्यामुळे बाल वाचनालय विभाग सुरू करण्यात आला. येथे येऊन विद्यार्थ्यांनी किमान एक तास पुस्तक वाचणं अपेक्षित आहे.- रुपा मुळे,  ग्रंथपाल, नगर वाचनालय

टॅग्स :SangliसांगलीSocialसामाजिक