सांगली : येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मंगळवारी प्राणीमित्रांना जखमी अवस्थेतील इजाट प्राणी आढळून आला. भिंतीला पडलेल्या एका भगदाडात लपलेल्या या इजाटला प्राणीमित्रांनी सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात दिले.सांगलीच्या शिवाजी स्टेडियमवर काहींनी या इजाटला पाहिले. मागील दोन्ही पायाला दुखापत झालेल्या अवस्थेत तो आढळुन आला. इन्साफ फाँऊडैशनचे प्रमुख व समाजसेवक मुस्तफा मुजावर यांना याची माहिती मिळाल्यानंतर ते त्यांचे सहकारी प्राणीमित्र गणेश पाटील यांच्यासह सर्व सामग्री घेऊन तेथे दाखल झाले.
सुरक्षितपणे इजाटला पकडून पुढील उपचारासाठी मंदार शिंपी व सुनिल कपाले यांच्यासोबत जाऊन वनविभागाच्या ताब्यात दिले. त्याला पकडण्यापासून उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यापर्यंत पापा पाटील यांनी मार्गदर्शन केले.