शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:07 IST

विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ठळक मुद्देनिवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने बाजारपेठेतड्रोन कॅमेऱ्याचा वापर

सदानंद औंधे मिरज : विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.निवडणुकीसाठी उमेदवारांसाठी प्रचारपत्रके, छत्री, झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले, बिल्ल्यांचा हार, पिशवी, रॅलीसाठी कट्आऊट, आकाश दिवा या प्रचार साहित्यासोबत डमी मतदान यंत्र, स्टेज व्हॅन, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅन, एलईडी सायकल डेमो, उमेदवाराचा माहितीपट, सोशल मीडियावर प्रचाराची व्हिडीओ क्लीप, एसएमएसव्दारे व्हॉईस कॉल, कलाकारांच्या आवाजात उमेदवाराच्या प्रचाराची ध्वनिफित, पथनाट्य पॅकेज उपलब्ध आहे.

अ‍ॅपव्दारे मतदारांना मोबाईल मेसेजव्दारे बुथनुसार मतदान स्लिप पाठविण्याची सोय आहे. मतदारांची नावे, महिला, पुरुष, जात, वय, पत्ता अशा वर्गीकरणाची सोय असलेले मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहेत. विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय मतदार यादी असलेल्या मोबाईल अ‍ॅपची लाखात किंमत आहे. मात्र अशिक्षित व स्मार्ट फोन नसलेल्या मतदारांसाठी प्रचार पत्रके व मतदान स्लिपांचा वापर करावा लागणार आहे.

सभा व कोपरा सभेसाठी खुर्च्या व ध्वनिक्षेपकाची सोय असलेल्या स्टेज व्हॅनचे प्रतिदिवस १० हजार रुपये, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅनचे प्रतिदिवस १० हजार रुपये भाडे आहे. उमेदवाराच्या एलईडी दिव्यांची सोय असलेल्या डेमो सायकलची सुमारे १० हजार रुपये किंमत आहे. उमेदवाराचे चिन्ह व ध्वज असलेल्या पाठीवर बांधता येणाऱ्या एलईडी डिस्प्लेची ३ हजारापर्यंत किंमत आहे.

ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून उमेदवाराच्या प्रचाराचा ३० मिनिटाचा माहितीपट तयार करण्यासाठी १ लाख रुपये खर्च आहे. कोणालाही परिधान करता येईल, असा उमेदवाराच्या चिन्हाचा फुग्याचा वेश उपलब्ध आहे. ८ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत झेंडे, बिल्लयाचा हार २० रुपये, डमी मतदान यंत्र १५० रुपये, मफलर ५ ते १० रुपये, छत्री २५० रुपये आकाश दिवा २५ रुपये अशा प्रचार साहित्याच्या किमती आहेत.

टॅग्स :miraj-acमिरजSangliसांगलीvidhan sabhaविधानसभा