शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
6
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
7
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
8
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
9
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
10
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
11
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
12
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
13
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
14
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
15
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
16
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
17
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
18
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
19
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
20
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला

तासगावात आज ऐतिहासिक रथोत्सव

By admin | Updated: September 18, 2015 00:07 IST

तासगाव संस्थानच्या गणपतीची दीड दिवसाची ऐतिहासिक परंपरा आहे. गणपतीच्या स्थापनेनंतर दुसऱ्याचदिवशी विसर्जन करण्यात येते. या दिवशीचा रथोत्सवही ऐतिहासिक असतो.

तासगाव : तासगावचा २३६ वा पारंपरिक ऐतिहासिक रथोत्सव शुक्रवार, दि. १८ रोजी होत आहे. यासाठी तासगाव गणेशनगरी सज्ज झाली आहे. श्री गणपती पंचायतनच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. गणेशभक्तांची उसळणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.मराठा साम्राज्याचे पेशवेकालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी १७७९ ला या ऐतिहासिक रथोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली २३६ वर्षे अव्याहतपणे रथोत्सवाची ही परंपरा सुरू आहे. तासगावचा गणपती दीड दिवसाचा असतो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजेच रथोत्सव होय. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रासह सीमाभागातून हजारो गणेशभक्त हजेरी लावतात.तासगाव गणपती पंचायतनच्यावतीने विश्वस्त राजेंद्र पटवर्धन, निरंजन पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने या रथोत्सवास सुरुवात होणार आहे. मंदिराची साफसफाई व रंगरंगोटी केली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रथाच्या पुढे मानाने डोलणारा हत्ती येणाऱ्या गणेशभक्तांचे स्वागत करायला मंदिराबाहेर उभा आहे. तासगाव संस्थानच्या गणपतीची दीड दिवसाची ऐतिहासिक परंपरा आहे. गणपतीच्या स्थापनेनंतर दुसऱ्याचदिवशी विसर्जन करण्यात येते. या दिवशीचा रथोत्सवही ऐतिहासिक असतो. (वार्ताहर)वाहतूक व्यवस्थेत बदलराज्यभरातून येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी तासगाव पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. सांगली, मिरज व कवठेमहांकाळ येथून येणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था नवीन तहसील कार्यालयासमोरील पटांगणात करण्यात आली आहे. आटपाडी, विटा, सावळज येथून येणाऱ्या वाहनांची चिंचणी रोड येथे, तर पाचवा मैल, भिलवडी, पलूस, तुरची येथून येणाऱ्या वाहनांसाठी भिलवडी नाका, दर्यावर्दी मंडळ, विद्यानिकेतन क्रीडांगण व जोतिबा मंदिर पाठीमागे व्यवस्था करण्यात आली आहे. एसटीसह इतर वाहने विटा नाका, बसस्थानक, सिद्धेश्वर चौक, भिलवडी नाका, बायपास ते वसंतदादा कॉलेज, सांगलीकडे त्याच उलट बाजूने बायपासने वळविण्यात आली आहेत.