शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:09 IST

water scarcity Sangli : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७ मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहीरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे, या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा थांग लागला.

ठळक मुद्दे आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीतमहाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे बारवेतील शिलालेखाचा लागला थांग

पलूस : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७ मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहीरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे, या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा थांग लागला.या शिलालेखावरील मजकुराचे विश्लेषण करुन इतिहास समाजासमोर आणण्याचे काम करणार असल्याचे मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. ६) आंधळी परिसरातील सिकंदर शिकलगार यांच्या शेतात ऐतिहासिक बारव असल्याची माहिती मिळाली होती.

मोहिमेतील कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता दगडाचे अत्यंत देखणे बांधकाम केलेली बारव समोर आली. हा ऐतिहासिक ठेवा आजपर्यंत समाजासमोर आला नाही याचेही आश्चर्य वाटले. गावापासून दूर व दुर्लक्षित ठिकाणी बारव आहे. बांधकामाची भव्यता पाहताक्षणी जाणवते. इतिहासाची साक्ष देणारी अंतर्गत रचना अजूनही मजबूत आहे.

मोठी दगडी कमान, आत उतरण्यासाठी असणाऱ्या दणकट पायऱ्या यामुळे ताकद स्पष्ट होते. आतील भिंतीवर शिलालेख आहे. त्यावर देवनागरी लिपीत मजकूर लिहिला असून पटवर्धन संस्थानिकांचा उल्लेख आहे. असाच शिलालेख कर्नाळ येथील बारवमध्येदेखील असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.दोहोंवरील मजकूर एकसराखा असून फक्त गावांच्या नावांचा फरक आहे. त्यामुळे हे दोन्ही शिलालेख आणि दोन्ही बारव एकाचवेळी बांधल्याचे दिसते. बारवमध्ये अजूनही थंडगार पाणी भरलेले असते.शिलालेखाची माहिती कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांना पाठवली आहे. त्यांच्याकडून लवकरच तपशीलवार माहिती उपलब्ध होईल असे बारव मोहिमेचे सदस्य महेश मदने यांनी सांगितले. या शोध मोहिमेत सिकंदर शिकलगार, दगडू जाधव, मारुती शिरतोडे यांनी भाग घेतला.

जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तु, बारव आणि इमारती अत्यंत सुस्थितीत आहेत. दोन-तीनशे वर्षांनंतरही त्या इतिहासाची साक्ष देत अखंडीत स्वरुपात उभ्या आहेत. शासनाने त्यांची निगा राखण्याची गरज आहे, तरच पुढील पिढीला हा ठेवा उपलब्ध होईल.- महेश मदने,महाराष्ट्र बारव मोहीम, सांगली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSangliसांगलीpalus-kadegaon-acपलूस कडेगाव