शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पेडमध्ये हिंदू-मुस्लिम समाजाच्या ऐक्याची निघाली पायी वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:53 IST

मांजर्डे : पेड (ता. तासगाव) येथे मोहरम आणि दिंडीच्या ऐक्याचा जागर पाहावयास मिळाला. यशवंत महाराजांच्या दिंडीचे पेड येथून पंढरपूरकडे ...

मांजर्डे : पेड (ता. तासगाव) येथे मोहरम आणि दिंडीच्या ऐक्याचा जागर पाहावयास मिळाला. यशवंत महाराजांच्या दिंडीचे पेड येथून पंढरपूरकडे पायी प्रस्थान झाले. यावेळी करबल मेलमधील मुस्लिम बांधव आणि वारकरी एकत्र आनंदाने नाचताना भक्तिमय वातावरण फुलून गेले होते. दिंडीमधील सहभागी सर्वधर्मीय आबालवृद्ध दिंडी आणि मोहरमच्या भक्ती सागरात बुडून गेले होते. यामुळे अनेक वर्षांची पेडच्या "हिंदू-मुस्लिम" ऐक्याची परंपरा कायम असल्याचा जणू संदेशच देत होता.सांगली जिल्ह्यात पेडची विविध सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात एक वेगळी संस्कृती आहे. धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपण्याचा वसा परंपरेने या गावात जपला जात आहे. सर्वधर्मीय एकमेकांच्या सुख-दुःखात न चुकता सामील होतात, ही येथील प्रत्येकाची संस्कृती आहे. विविध जाती-धर्मातील सण-उत्सवामध्ये ओसंडून वाहणारा आनंद देणारे गाव अशी पेडची ख्याती आहे. मोठ्याने लहानाला जपायचे असते अशी शिकवण पूर्वापार येथे पाळली जाते. सालाबादप्रमाणे, पेडमधून पंढरपूरला पायी दिंडीचे प्रस्थान झाले. त्यावेळी, मोहरम आणि दिंडी एकत्र साजरी करताना सर्वधर्मीय आनंदाला उधाण आले होते. दिंडीला पंढरपूरकडे रवाना करताना बाहेरील वाड्यासमोरील मशिदीसमोर नजीर शिकलगार यांनी फराळाचे वाटप केले. मोहरम आणि दिंडी यांचा अनोखा सर्वधर्मीय उत्साह खऱ्या मानवतेचे दर्शन देणारा ठरल्याच्या भावना व्यक्त होत होत्या. मानवता जपणारे गाव म्हणून पेडची ओळख आहे. पेडमधील दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान झाले. मोहरम आणि दिंडी असा नयनरम्य सोहळा संपन्न झाला.

टॅग्स :SangliसांगलीMuslimमुस्लीमHinduहिंदू