नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या शंभरावर गेली आहे. बाधितांच्या कुटुंबियांना विलगीकरणात ठेवल्याने त्यांच्यासमाेर अडचणी निर्माण होत होत्या. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रसिद्धीपासून दूर राहत लष्करातून निवृत्त झालेल्या एका कॅप्टनने गरजू कुटुंबांना मदत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक प्रतीक पोरे यांना विनंती केली.
प्रतीक पोरे यांनी आरोग्यसेविका जयश्री धायगुडे व लता सुतार यांच्या मदतीने लाभार्थी गरजू कुटुंबाची नावे या कॅप्टनना कळविली. त्यांनी स्थानिक मॉलमधून सुमारे दोन हजार रुपयांचे अन्नधान्याचे किट तयार करून गरजू कुटुंबांना पोहोचविले. मदत देऊनही स्वतःचे नावही न कळू देणाऱ्या या निवृत्त कॅप्टनचे कौतुक होत आहे.
चौकट :
अनमाेल मदत
कोरोनाबाधित कुटुंबात खरोखरच अनेक अडचणी आहेत. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रतीक पोरे यांनी केले. तुमची मदत एखाद्या कुटुंबाला नक्कीच फायदा होणार आहे. नागजमधील माजी कॅप्टनची मदत अनमोल आहे. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो, असेही प्रतीक पोरे यांनी सांंगितले.
फोटो : १२ ढालगाव १
ओळ : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील कोरोनाबाधित कुटुंबात निवृत्त कॅप्टनने दिलेली मदत प्रतीक पोरे यांच्यासह आरोग्य सेविकांनी पाेहाेचविली.