संजयनगर : लांडग्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळाला येथील जनसेवा फळे-भाजीपाला संघटनेने आर्थिक मदत केली. संजयनगर आठवडा बाजारामध्ये हा निधी मेंढपाळाकडे सुपूर्द करण्यात आला.
राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील रंगराव बाबू जोंग मेंढपाळाने पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे एका शेतात आपला कळप उतरवला आहे. रविवारी दुपारच्यासुमारास मेंढपाळ बेसावध असताना लांडग्यानी केलेल्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या.
याची दखल घेत बुधवारी संजयनगर येथील आठवडा बाजारात सात हजार रुपयांची रक्कम मेंढपाळाकडे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, उपाध्यक्ष कैस अलगूर, सचिव अजित राजोबा यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी अभय म्हारगुडे, अजय दुधाळ, संभाजी काळेल, लताताई दुधाळ, लताताई पाटील, दादा लोखंडे, नामदेव धायगुडे उपस्थित होते.
फोटो-१८दुपटे१