शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:25 IST

पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्देसांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना...टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही, प्रवाशांचे हाल

अविनाश कोळी सांगली : पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.सांगली ते पेठ या रस्त्याच्या कामावरून गेली पाच वर्षे नागरिक, सामाजिक संघटनांचा संघर्ष सुरू आहे. सांगली ते पेठ या रस्त्यासाठी २०१७ मध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाने दिल्लीलाही हादरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव या रस्त्याला देण्याची अभिनव आंदोलनाची कल्पना राबविली गेल्यामुळे त्याचा डंका गुजरातपर्यंत वाजला. त्यामुळे राज्य महामार्गातून सुटका करीत या रस्त्याचा समावेश राष्टÑीय महामार्गात करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनल्यानंतरही रस्त्याचे दुखणे थांबलेले नाही. प्रवाशांना, येथील शेतकऱ्यांना, नागरिकांना गेली अनेक वर्षे हा रस्ता छळत आहे.तीन वर्षापूर्वी पेठ ते सांगली या मार्गाच्या डांबरीकरणासाठी तीन टप्पे करण्यात आले. बावची फाटा ते वाळवा फाटा, औदुंबर फाटा ते मिरजवाडी आणि तुंग ते सांगलीवाडी टोल नाका अशा टप्प्यात हे काम मंजूर झाले होते. संबंधित ठेकेदारांनी काम पूर्ण केल्यानंतर तुंग ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतच्या कामात पुन्हा दोन भाग पाडण्यात आले. तुंग ते कसबे डिग्रज आणि कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाका अशा दोन टप्प्यांचे शेपूट दीर्घकाळ रखडले. यातील तुंग ते कसबे डिग्रज हे काम पूर्ण झाले असले तरी, कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतचे काम अद्याप सुरू झालेले नाही.गेले पाच महिने पडणाºया पावसामुळे केवळ पॅचवर्क करण्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणताही पर्याय उरला नव्हता, मात्र पावसाने पॅचवर्क वाहून गेल्याने प्रवाशांचे भल्यामोठ्या खड्ड्यांमधून मुठीत जीव घेऊन मार्गक्रमण करणे चालू झाले आहे. वेदनांचा हा प्रवास पाऊस थांबेपर्यंत चालू राहणार आहे. नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली