शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

सांगली जिल्ह्यात धुवांधार पाऊस, चार सर्कलमध्ये अतिवृष्टी; खरीप पिकांचे मोठे नुकसान

By अशोक डोंबाळे | Updated: September 24, 2024 13:10 IST

सांगली : ढगांच्या गडगडाटासह रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने सांगलीसह जिल्ह्याला झोडपून काढले. सांगली शहर जलमय होऊन ...

सांगली : ढगांच्या गडगडाटासह रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने सांगलीसह जिल्ह्याला झोडपून काढले. सांगली शहर जलमय होऊन रस्ते, चौकात पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच तासगाव, मिरज, कडेगाव तालुक्यातील चार सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली असून ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत होते. जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात २५.९ मिलीमीटर पाऊस झाला.जिल्ह्यात दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. रविवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सांगलीसह बेडग, तासगाव, येळावी, कडेगाव तालुक्यातील नेवरी या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे परिसर जलमय झाला. जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होत असल्याने पुन्हा ओढे, नाले तलाव ओसंडून भरुन वाहू लागले आहेत.शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले आहे. खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात भागात सोयाबीनच्या काढणी वेळीच पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक गमावण्याची वेळ आली आहे.

चाेवीस तासातील तालुकानिहाय पाऊस (मिलीमीटर)तालुका पाऊसमिरज ४३.९जत ११खानापूर २४वाळवा ३०.९तासगाव ३३.४शिराळा ३१.१आटपाडी ४.४क.महांकाळ १४पलूस ३२.५कडेगाव ४४.५एकूण २५.९

येथे अतिवृष्टीबेडग (ता. मिरज) सर्कलमध्ये ६६.८ मिलीमीटर, येळावी (ता. तासगाव) ७४.५, तासगाव ६७, नेवरी ६५.५ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे प्रशासनाने अतिवृष्टी जाहीर केली आहे. तसेच खानापूर तालुक्यातील करंजे ३६ मिलीमीटर, भाळवणी ५७.३, वाळवा तालुक्यातील ४३.८, तांदूळवाडी ४३.८, शिराळा ४०.३, पलूस तालुक्यातील अंकलखोप ४७.३, भिलवडी ४६.५ आणि वांगी (ता. कडेगाव) सर्कलमध्ये ४९.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfarmingशेती