शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट, किमान तापमान विक्रमाकडे : कमाल तापमान ४0.२ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:29 IST

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट येणार आहे. किमान तापमानाचा आजवरचा २६.४ अंश सेल्सिअसचा विक्रम यंदा मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. किमान तापमान २९अंशापर्यंत तर कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात येणार उष्णतेची लाटकिमान तापमान विक्रमाकडे : कमाल तापमान ४0.२ अंश

सांगली : भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट येणार आहे. किमान तापमानाचा आजवरचा २६.४ अंश सेल्सिअसचा विक्रम यंदा मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. किमान तापमान २९अंशापर्यंत तर कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात ९ मे २0१0 मध्ये २६.४ अंश सेल्सिअसची विक्रमी नोंद झाली होती. २0१0 चा अपवाद वगळता कधीही सांगली जिल्ह्याचे किमान तापमान २६ अंशापर्यंत पोहचले नव्हते. रविवारी जिल्ह्याचे किमान तापमान २५ अंश नोंदले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी २६ मे रोजी ते २६ अंशावर, २७ मे रोजी २८ अंशावर तर २८ मे रोजी २९ अंशावर जाणार आहे.

कमाल तापमानही या आठवड्यात ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या इतिहासात ६ मे १९९३ मे रोजी सर्वाधिक कमाल तापमान ४२.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्या विक्रमाच्या जवळपास यंदाचे तापमान जाणार आहे. मे महिन्यातील सरासरी कमाल तापमानाचा विचार केल्यास रविवारचे तापमान ३ अंशाने तर किमान तापमान २ अंशाने अधिक होते.उष्णतेची ही लाट नागरिकांसाठी असह्य होण्याची शक्यता आहे. आगामी आठवडाभर जिल्ह्याचे तापमान अंशत: ढगाळ राहणार आहे. यंदाच्या उष्णतेच्या लाटेत कमाल तापमानापेक्षा किमान तापमानाचा आकडा सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. दिवसा उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागेल.पुणे वेधशाळेकडून पावसाचा अंदाजपुणे वेधशाळेने सोमवारी दिलेल्या अहवालानुसार पुणे व आसपासच्या जिल्ह्यात ३0 व ३१ मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून मात्र जिल्ह्याच्या सहा दिवसांच्या हवामान अंदाजात तसा उल्लेख नाही.

टॅग्स :TemperatureतापमानSangliसांगली