शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या खटल्याची सुनावणी १६ जानेवारीला, सांगलीतील शिराळा न्यायालयात १४ वर्षांपासून खटला प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 18:19 IST

ठाकरे सातत्याने सुनावणीस गैरहजर

शिराळा : शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील मनसेच्या आंदोलनप्रकरणी शिराळा न्यायालयात दाखल खटल्याची सुनावणी मंगळवारी झाली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अन्य कामात व्यस्त असल्याने त्यांच्या गैरहजेरीचा अर्ज देण्यात आला. प्रथमवर्ग न्यायाधीश प्रीती श्रीराम यांनी अर्ज मंजूर करून पुढील सुनावणी १६ जानेवारीस ठेवली. या खटल्यात दोषारोप ठेवण्यासाठी मंगळवारची तारीख ठेवण्यात आली होती.शेडगेवाडी येथे २००८ मध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. या आंदोलनाचा खटला येथील न्यायालयात १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. आंदोलनात ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही, त्यामुळे त्यांचे नाव खटल्यातून वगळावे, असा अर्ज प्रथमवर्ग न्यायाधीश प्रीती श्रीराम यांनी फेटाळला होता.दोषारोप ठेवण्याकरिता ६ डिसेंबर तारीख देण्यात आली होती. त्यामुळे मंगळवारी ठाकरे यांच्यासह एकूण सर्व १० आरोपींनी न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याचा ठपका ठेवण्यात येणार होता. सरकारी वकील ॲड. संदीप पाटील यांनी सरकारतर्फे, तर ॲड. विजय खरात, ॲड. सतीश कदम, ॲड. रवी पाटील यांनी राज ठाकरे व शिरीष पारकर यांच्या वतीने काम पाहिले.

ठाकरे सातत्याने सुनावणीस गैरहजर

  • शिराळा न्यायालयामार्फत या खटल्यात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र, राज ठाकरे व शिरीष पारकर सुनावणीस गैरहजर राहत होते. दि. ८ जून रोजी झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील संदीप पाटील यांनी २००८ पासून या खटल्यातील आरोपी तारखेला हजर राहत नाहीत. त्यामुळे पारकर यांना जामीन मंजूर करू नये, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवावे, असा युक्तिवाद केला.
  • पारकर यांना दि. ८ जून रोजी १५ हजार रुपयांच्या जामिनावर व ७०० खर्चाची दंडाची रक्कम भरून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाकरे वॉरंट हुकूम होऊनदेखील न्यायालयात हजर राहिले नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश दिला होता.
  • ठाकरे यांच्या वकिलांनी इस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रिट दाखल केला होता, त्यावेळी तेथे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेCourtन्यायालय