शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात आलबेल असल्याचा आभास; विरोधकही डोके वर काढणार :- नाराजांना रोखण्याची भाजपसमोर डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 19:18 IST

दुसरीकडे राज्यात सत्ता आल्याने काँग्रेस आघाडीला बळ मिळाले आहे. आताच्या निवडीत आघाडीचा ‘प्लॅन’ फसला असला तरी, भविष्यात आघाडीशी दोनहात करावे लागणार आहेत.

ठळक मुद्देनूतन महापौर, उपमहापौर निवड

शीतल पाटील -

सांगली :  महापालिकेतील सत्तेला दीड वर्ष पूर्ण होत असतानाच, सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी उफाळून आली आहे. महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महापालिकेचा गाडा हाकताना पारदर्शी कारभारासोबतच आता या नाराजांना रोखण्याचे आव्हान भाजपसमोर असेल. दुसरीकडे राज्यात सत्ता आल्याने काँग्रेस आघाडीला बळ मिळाले आहे. आताच्या निवडीत आघाडीचा ‘प्लॅन’ फसला असला तरी, भविष्यात आघाडीशी दोनहात करावे लागणार आहेत.

आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवित पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन केली. या कालावधित सर्वत्र भाजपची सत्ता होती. पण दीड वर्षात महापालिकेतील सत्तेला ग्रहण लागले आहे. महापौर, उपमहापौरांचे राजीनामानाट्य, त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी निर्माण झालेली नाराजी, महापालिकेचे नेते शेखर इनामदार यांना डावलणे, नगरसेवकांच्या वाढलेल्या अपेक्षा यांसह विविध कारणांनी नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपमध्ये सारे काही आलबेल असल्याचे दाखविण्यात नेत्यांना यश आले असले तरी, निवडीनंतर अनेक नगरसेवकांनी महापालिका मुख्यालय तातडीने सोडले. यावरूनच अजूनही नाराजी कायम असल्याचे स्पष्ट होते.

महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी भाजपने कोअर कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही आमदारांनी महापालिकेपासून दूर राहणेच पसंत केले होते. पण जनतेने आमदारांच्या कामाकडे पाहून भाजपला सत्ता दिली, याचा विसर साऱ्यांनाच पडला आहे. परिणामी कोअर कमिटीतही संघर्ष उफाळून आला आहे. महापालिकेतील बरे-वाईट कारभाराचे खापर शेवटी दोन्ही आमदारांवरच फुटणार आहे. त्यात गेल्या दीड वर्षात अनेक वादग्रस्त विषयांच्या जाळ्यात भाजप अडकली आहे. नगरसेवकांत दुफळी आहे. पारदर्शी कारभाराचा आभास निर्माण झाला आहे. यात पक्षात नाराजी उफाळून आली, तर वर्षभरानंतर होणा-या महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल.

दीड वर्षात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला कोंडीत पकडण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या आहेत. पण आताच्या निवडीवेळी सत्ता पालटण्यासाठी आघाडीने कंबर कसली होती. दहा ते बाराजण संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. विरोधकांचा बार फुसका ठरला असला तरी, भविष्यात विरोधक पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यात नाराजांचा अधिक भर पडल्यास, ते भाजपच्या सत्तेसाठी घातक ठरू शकते.

नाराजी कायमविधानसभा निवडणुकीपासून महापालिकेतील भाजपअंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्याला महापौर, उपमहापौर निवडीने आणखी हवा मिळाली. भाजपच्या कोअर कमिटीत फाटाफूट झाली आहे. शुक्रवारी महापौर, उपमहापौर निवडीनंतर काही नगरसेवकांनी तातडीने महापालिका मुख्यालय सोडले. महापालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती असलेले शेखर इनामदारही सत्कारावेळी गायब होते. महापौर, उपमहापौरांना नेत्यांच्या उपस्थितीत खुर्चीत बसविण्यात आले. पण त्यालाही इनामदार यांच्यासह त्यांचे निष्ठावंत नगरसेवक गैरहजर होते. यावरून भाजपला भविष्यात महापालिकेत तारेवरची कसरत करावी लागणार, हे स्पष्ट आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिका