शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बिरोबाची शपथ! शर्यतीत बैलांना शॉक देणार नाही; सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत शर्यतवानांची बैठक 

By संतोष भिसे | Updated: September 2, 2023 16:53 IST

भंडारा उचलून घेतल्या आणाभाका, नियम मोडल्यास दोन महिने बंदी

सांगली : बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली, पण शर्यतवानांचे शेपूट वाकडेच राहिल्याचे दिसत आहे. शर्यतीमध्ये बैलांचा छळ सुरूच असल्याने शर्यतींवर पुन्हा बंदीची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शर्यत संघटनांनी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे बैठकीत ठोस निर्णय घेतले. बिरोबाचा भंडारा उचलून नियम पाळण्याची शपथ घेतली. नियम मोडणाऱ्यांवर दोन महिने बंदीचा निर्णय घेतला.आरेवाडीच्या बनात झालेल्या बैठकीला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून बाळासाहेब हजारे, आप्पासाहेब हजारे, रामचंद्र खोत, पश्चिम महाराष्ट्र रेसिंग असोसिएशनचे नारायण गाडगीळ, सचिन पाटील यांच्यासह शर्यत संयोजक उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत शर्यतींसाठी लाखो रुपयांची बक्षिसे लावली जात असल्यानेही बैलांच्या छळात वाढ झाल्याचा सूर बैठकीत व्यक्त झाला.

बैलांना शॉक आणि दुचाकीने ढकलिंगबैल जोराने पळावा म्हणून त्याला बॅटरीद्वारे शॉक दिला जात आहे. शेपटी पिरगाळण्याचे प्रकार सुरू आहेत. लाठीकाठीवर बंदी असतानाही वापर सुरू आहे. शर्यतीसाठी ५० हजार रुपयांची अनामत भरून सरकारी परवानगी घ्यावी लागते, ती टाळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर सकाळी उजाडता-उजाडता विनापरवाना चोरट्या शर्यती घेतल्या जात आहेत. या गैरप्रकारांवर बैठकीत चर्चा झाली.

बिरोबाचा भंडारा शिवून घेतली शपथ

बैठकीमध्ये आरेवाडीच्या बिरोबाचा भंडारा शिवून शपथ घेण्यात आली. शर्यतीसाठी नियम निश्चित करण्यात आले.

  • गैरप्रकार करणाऱ्या चालक, मालकांना व त्यांच्या बैलांना दोन महिने शर्यतीत बंदी
  • मालकाच्या अपरोक्ष बैलांचा छळ करणाऱ्या गाडीवानाला दोन महिने बंदी
  • मालक, चालक, मित्र आदींनी संगनमताने गैरकृत्ये केल्यास सर्वांना आदतपासून जनरलपर्यंत सर्व शर्यतींसाठी मनाई

 

शर्यतींमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी नियम बनविले आहेत. त्यानुसार सध्या शर्यती व्यवस्थित सुरु आहेत. स्पर्धकांनीही शर्यतींमध्ये बैलांची काळजी घेणे अपेक्षित आहे, अन्यथा पुन्हा निर्बंध येऊ शकतात. - नारायण गाडगीळ, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र रेसिंग असोसिएशन

टॅग्स :SangliसांगलीBull Cart Raceबैलगाडी शर्यत