शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

देशाच्या अखंडतेसाठी धोकादायक वातावरण : सीताराम येचुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:19 IST

विटा : राजकीय स्वार्थासाठी एका भावाला दुसऱ्या भावाबरोबर लढाई करण्यास भाग पाडले जात आहे. धर्माच्या नावावर बटवारा करून जातीय भेदभाव निर्माण केला जात असल्याने देशाच्या अखंडतेला आज मोठा धोका निर्माण झाला आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हाकलून देऊन ज्या विश्वासाने त्यांनी आपल्याकडे संविधान सोपविले, ते संविधान आज अशा अस्थिरता व धर्म, भाषांच्या ...

ठळक मुद्देक्रांतिकारकांनी दिलेले संविधान वाचविण्याचे मोठे आव्हान; विट्यात क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान

विटा : राजकीय स्वार्थासाठी एका भावाला दुसऱ्या भावाबरोबर लढाई करण्यास भाग पाडले जात आहे. धर्माच्या नावावर बटवारा करून जातीय भेदभाव निर्माण केला जात असल्याने देशाच्या अखंडतेला आज मोठा धोका निर्माण झाला आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हाकलून देऊन ज्या विश्वासाने त्यांनी आपल्याकडे संविधान सोपविले, ते संविधान आज अशा अस्थिरता व धर्म, भाषांच्या भेदभावामुळे संकटात आले आहे. त्यामुळे क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपणांकडे सोपविलेले संविधान वाचविण्याचे मोठे आव्हान आजच्या तरूणांपुढे असल्याचे मत भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस, ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले.

विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ कॉम्रेड येचुरी यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी क्रांतिवीरांगणा श्रीमती हौसाताई पाटील, अशोक ढवळे, प्रा. बाबूराव गुरव, व्ही. वाय. पाटील, प्राची दुधाणे, अ‍ॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार उपस्थित होते.कॉ. येचुरी म्हणाले, सध्या देशातील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अन्नदात्या शेतकºयांना कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करावी लागत आहे. त्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत, तर दुसरीकडे साडेअकरा लाख रूपयांचे कर्ज घेऊन देश सोडून फरार झालेल्या उद्योगपतींचे साडेतीन लाख रूपयांचे कर्ज माफ केले जात आहे.

यावेळी बोलताना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी, व्यक्तीच्या करिअरपेक्षा राष्टÑाची प्रगती महत्त्वाची आहे. ते काम कॉ. सीताराम येचुरी करीत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विचार ज्या उंचीपर्यंत होते, त्याच उंचीची व्यक्ती असलेले कॉ. येचुरी यांना पुरस्कार देण्यात आला, हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच कॉ. अशोक ढवळे यांनी, गेल्या २५ वर्षात देशातील चार लाख शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. महाराष्टÑात शेतकºयांनी मागण्यांसाठी लॉँगमार्च काढला, दूध आंदोलन केले, परंतु, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. हे चित्र बदलायला हवे, असे सांगितले.अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास देवदत्त राजोपाध्ये, नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील, स्वाती पाटील, भाई संपतराव पवार, प्रा. पी. ए. शितोळे, दिलीप सव्वाशे उपस्थित होते. विजयकुमार महिंद यांनी आभार मानले.सरकारच्या धोरणांवर टीकायावेळी येचुरी यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भारतीय संविधानात असलेले वायदे पूर्ण करण्यासाठी चांगली नीती पाहिजे. ती नीती आत्मसात केली, तर आज युवकांना शिक्षण, नोकरी देता येईल. परंतु, दररोज नवनवीन घोषणा करून लोकांना विचारातून बाहेर पडू न देण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. उत्तर प्रदेशातील मुगलसरायचे नाव बदलून पंडित दीनदयाळ असे करण्यात आले. त्यामागे राजकीय हेतू आहे. सामाजिक न्याय, आत्मिक निर्भयता, देशातील लोकशाही वाचविण्यासाठी किंवा केंद्र व राज्य सरकारमधील संघवादाचा असलेला प्रश्न संपविण्याचे मोठे आव्हान आज देशासमोर उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी युवकांनी संविधान वाचविण्याचा संकल्प करावा, हीच क्रांतिकारकांना खरी श्रध्दांजली ठरेल, असेही येचुरी म्हणाले.