शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 09:54 IST

सांगली शहर व परिसरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

सांगली : उधाणलेल्या भक्तीसागरात न्हाऊन निघत शनिवारी (31 मार्च) सांगली शहर व परिसरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलही दिसत आहे. सांगलीत अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे आहेत. मारुती चौकातील प्रसिद्ध मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास 20 भाविक तरुणांनी कृष्णा नदीतून 20 कलश पाणी आणून पंचमुखी मारुती मंदिरात आणले. त्याठिकाणी पहाटे 4 वाजता मूर्तीस स्नान घालण्यात आले. त्यानंतर पंचामृत अभिषेक घालून परशुरामदास बैरागी यांनी पूजा केली. मंगलसनई, भुपाळी सादर करण्यात आली. त्यानंतर 6 वाजून 32 मिनिटांनी जन्मकाळ कीर्तनास सुरुवात झाली. भाविकांनी फुले वाहून हनुमानाचा जयजयकार करीत जन्मोत्सवाचा जल्लोष केला. मारुती व पंचमुखी मारुती मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. 

माधवनगर रोडवरील लक्ष्मीनगर येथील संकटमोचन मारुती मंदिर व नवग्रह शनि मारुती मंदिरातही पहाटेपासून कार्यक्रम सुरू होते. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. हनुमान जयंतीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून मंदिरांमध्ये तयारी सुरू होती. भगव्या पताका, भगवे ध्वज, फुलांची आरास, विद्युत रोषणाईने मंदिरांना साज चढविला होता. रतनशीनगर, कॉंग्रेस भवन चौकातील रिक्षा थांबा, म्हसोबा गल्ली, पंचशीलनगर, विश्रामबाग, माधवनगर याठिकाणच्या मारुती मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होती. काही ठिकाणी महाप्रसादही ठेवण्यात आला होता. 

भक्तीमय वातावरणपहाटे 4 वाजल्यापासून शहरातील विविध मंदिरांमध्ये भक्तीगीते सुरू आहेत. भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. शहर भक्तीमय वातावरणात हरवले आहे.