शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस येथील मुलगीवर अत्याचार करणा-या नराधमांना फाशी द्या -ः आरपीआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 17:23 IST

Hathras Gangrape, sangli news, rpi, collcatoroffice उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मागासवर्गीय मुलगीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी निषेध नोंदवत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) यांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देहाथरस येथील मुलगीवर अत्याचार करणा-या नराधमांना फाशी द्या -ः आरपीआयसांगलीत निदर्शने, जिल्हाधिका-यांना निवेदन सादर

सांगली- उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मागासवर्गीय मुलगीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी निषेध नोंदवत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) यांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले,या अमानवी हत्याकांडास जबाबदार असणा-या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबतची कलमे नोंदवून त्वरीत फाशी द्यावी,हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे तसेच तेथील जिल्हाधिकायांचीही चौकशी करावी अशी मागणी केली.जेष्ठ नेते सुरेश दुधगांवकर म्हणाले,उत्तरप्रदेश सरकारचा जाहीर निषेध करित असुन ह्या तरुणीवर जाणुनबुजुन जातीय द्वेषातुन अत्याचार करण्यात आला आहे. सर्व आरोपींना कडक शिक्षा करावी.या हत्याकांड प्रकरणी लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्हा बंद करुन तीव्र आंदोलन करु असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छाया सर्वदे,सरचिटणीस अरुण आठवले यांनीही निषेध नोंदवला.या आदोलंनात डॉ.रविकुमार गवई, बापु सोनावणे, प्रभाकर नाईक, संतोष सरवदे, सुमन वाघमारे, नितेश वाघमारे, माणिक गस्ते, शिवाजी वाघमारे, मिलिंद कांबळे, जितेंद्र बनसोडे यांचेसह कार्यकर्ते सहभागी होते.(फोटो ओळ-हाथरस प्रकरणी निदर्शने करताना आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे,सुरेश दुधगांवकर,अशोक कांबळे,छाया सरवदे आदी)

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारSangliसांगली