शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाणांनी कोपऱ्यापासून जोडले हात, सांगितलं राज्यपाल असं का वागतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 19:57 IST

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती.

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अशीच विधाने केली होती. त्यामुळे, राज्यभरात कोश्यारी यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला. राजकीय पक्षांनी रस्त्यांवर उतरून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. काँग्रेसनेही जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला. आता, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यालांची ही कृती मुद्दामहूनच होत असल्याचं दावा केला आहे. 

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, सावरकर वाद आणि राज्यपाल कोश्यारींवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोश्यारी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी कोपऱ्यापासून हातच जोडला. राज्यपालांना कोपऱ्यापासून हात जोडत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यामागचं कारण सांगितलं. कोश्यारी हे मुद्दामहून अशी विधानं करत आहेत, खरंतर त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये परत जायचंय, त्यांना पुन्हा राजकारणात सक्रीय व्हायचं आहे. मात्र, मोदी त्यांना सोडत नाहीत. म्हणजे काहीतरी करुन ते त्यांना घालवतील. पुढे त्यांना परत मुख्यमंत्री व्हायचंय, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.   

मी मुख्यमंत्री असतानाची कामे

शुक्रवार, दि. २५ रोजी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कºहाडात येत आहेत. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, नविन विश्रामगृहाचे उद्घाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली व रेठरे नवीन पुलाचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते आयोजित केले असल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSangliसांगलीMumbaiमुंबई