शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सांगली जिल्ह्यातील गायरानमधील ११४६८ बांधकामांवर पडणार हातोडा, मास्टर प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:29 IST

पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत

सांगली : जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील गायरान जमिनीवर ११ हजार ४६८ बांधकामे झाली असून, यावर हातोडा टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेकडून पूर्ण नियोजन झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. यातूनही अतिक्रमणे हटविली नाही तर विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित केली असून, त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून २७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर असा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला. त्यानुसार जिल्ह्यात गायरान जमिनीमध्ये ११ हजार ४६८ बांधकामे झाली आहेत. जवळपास १० हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर बांधकामे झाले असून ही हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शासकीय ३९५.४७ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणेही हटविण्यात येणार असून, जमिनी ताब्यात घेण्यात येणार आहेत.

३१ डिसेंबरपूर्वी अतिक्रमणे हटविणार : राजा दयानिधीसर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ ची डेडलाइन दिली. यासाठी कालबद्ध नियोजन व आराखडा निश्चित केला. नेमकी जमीन अन् अतिक्रमणे किती याची अद्ययावत माहिती जिल्हा प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती संकलन सुरू असून, त्यानंतरच अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्ह्यात अशी आहेत अतिक्रमणेतालुका           गायरान जमिनीतील बांधकामेमिरज                ३५३६तासगाव             २३८७क. महांकाळ       १५५०जत                  ५३३खानापूर             ४५४आटपाडी           २४७कडेगाव             १०९३पलूस                १८८वाळवा              १३६३शिराळा             १९७एकूण               ११४६८गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरण करा : उमेश देशमुखगायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी १९९१ मध्ये कर्मवीवर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन राज्य शासनाने नियमितीकरण केले होते. त्यानुसार सध्याची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने नियमितीकरण केली पाहिजेत. एकाही अतिक्रमणास प्रशासनाने हात लावू नये, अशी मागणी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली