शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

 सराफ फेडरेशन हॉलमार्क कायद्याविरोधात कायदेशीर लढाई लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:12 IST

केंद्र सरकारने हॉलमार्कचा कायदा करताना सराफांना चोर समजूनच केला आहे. सरकारने यामाध्यमातून बिझनेसचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा महाराष्ट्र सराफ फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेसिंह रांका यांनी शनिवारी सांगलीतील सराफांच्या मेळाव्यात दिला.

ठळक मुद्देहॉलमार्क कायद्याविरोधात कायदेशीर लढाई लढणार सांगलीतील सराफांच्या मेळाव्यात इशारा

सांगली : केंद्र सरकारने हॉलमार्कचा कायदा करताना सराफांना चोर समजूनच केला आहे. सरकारने यामाध्यमातून बिझनेसचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा महाराष्ट्र सराफ फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेसिंह रांका यांनी शनिवारी सांगलीतील सराफांच्या मेळाव्यात दिला.सांगली जिल्हा सराफ समितीच्यावतीने येथील दैवज्ञ भवनात शनिवारी सायंकाळी सराफांचा मेळावा पार पडला. यावेळी फत्तेचंद रांका यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शास्त्रज्ञ आणि ब्युरो आॅफ इंडियन स्टँन्डर्सचे अध्यक्ष संजय कुमार यांनी हॉलमार्क कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी राज्य सराफ फेडरेशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, राजाभाऊ वार्इंकर, बाबूराव जोग, वडगावचे नगराध्यक्ष मोहन माळी, सिध्दार्थ गाडगीळ, पंढरीनाथ माळी, भूषण जोशी आदी उपस्थित होते.रांका म्हणाले की, हॉलमार्कला राज्यातील सराफांचा विरोध नाही, मात्र ज्यापद्धतीने हा कायदा आणला गेला, ती पद्धत चुकीची आहे. सराफांच्या अडचणींचा विचार केला गेला नाही. हा कायदा करण्यामागे राजकारण आहे. हॉलमार्क केंद्रचालक संघटनेचा मंत्र्यांवर मोठा दबाव असल्याचे आम्हाला जाणवत आहे. त्यामुळे आमची बाजू ऐकून घेतली नाही.ते म्हणाले की, नीती आयोगाने हॉलमार्कवर वीस पानांचा अहवाल दिला आहे. त्यांच्या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत चुकीच्या माहितीच्या आधारे हा कायदा केला गेला आहे. भारतात उत्तम प्रतीचे सोने असताना, या कायद्याची गरजच काय? सर्वच कॅरेटच्या सोन्यावर हॉलमार्क हवे.

नव्या प्रणालीतून शासनाला सुमारे दोन हजार कोटी रुपये मिळणार आहेत. शासनाने या माध्यमातून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करू नये.संजय कुमार यांनी सर्व सराफ व्यावसायिकांना हॉलमार्क कायदा बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले. यावेळी बाबूराव जोग यांनी स्वागत, तर जितेंद्र पेंडूरकर यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :GoldसोनंSangliसांगली