शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

हळदीचा यंदाचा हंगाम तेजीत -आवकेत वाढ ; उत्तर भारतात मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:41 IST

हळदीसाठी संपूर्ण भारतात प्रसिध्द असलेल्या सांगली बाजारपेठेतील हळदीच्या उलाढालीत यंदा चांगलीच वाढ झाली आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार व मालासही मागणी मोठी असल्याने यंदा स्थानिकसह परपेठेतील हळदीची आवक वाढली आहे.

ठळक मुद्दे दरही समाधानकारक

सांगली : हळदीसाठी संपूर्ण भारतात प्रसिध्द असलेल्या सांगली बाजारपेठेतील हळदीच्या उलाढालीत यंदा चांगलीच वाढ झाली आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार व मालासही मागणी मोठी असल्याने यंदा स्थानिकसह परपेठेतील हळदीची आवक वाढली आहे. सोमवारी झालेल्या हळद सौद्यावेळी राजापुरी हळदीची १९ हजार ११४ क्विंटल विक्री झाली, तर निजामाबादच्या ६ हजार ७३८ पोती हळदीची विक्री झाली. 

हळदीच्या व्यवहारासाठी देशात सर्वात सुरक्षित बाजारपेठ म्हणून सांगलीचा उल्लेख होतो. यंदाही हळदीची आवक चांगली होत असून, कर्नाटकातील हळदीच्या आवकेत वाढ झाली आहे. कर्नाटकातील हारूगिरी, गोकाक, बागलकोट, घटप्रभा, तेरदाळ परिसरात हळदीचे उत्पादन वाढले आहे. या भागाला सांगली बाजारपेठ सोयीची असल्याने आवक होत आहे. यासह परपेठेतील तेलंगणा, आंध्रप्रदेशातून व नाशिक, नांदेड, जळगावसह स्थानिक भागातून आवक होत आहे. 

सध्या प्रत्येक सौद्याला सरासरी २० हजार पोती हळदीची आवक होत आहे. सांगली बाजारपेठेची वार्षिक उलाढाल १२ लाख पोत्यांवर असते. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील हळदीचे उत्पादन चांगलेच घटल्याने उत्तर भारतात सांगलीच्या हळदीला मागणी वाढली आहे. त्यामुळे दिल्ली, कानपूर, अहमदाबाद या बाजारपेठेत सांगलीतून हळद जात आहे. 

सध्या उच्च प्रतीच्या हळदीला ९ हजार ते १३ हजार रुपये प्रती क्विंटल, चांगल्या प्रतीच्या हळदीला ७ हजार ते ८ हजार, तर पावडर क्लॉलिटी हळदीला साडेसहा हजार ते ७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. सोमवारी हळद सौद्यांमध्ये राजापुरी हळदीची १९ हजार ११४ क्विंटल विक्री झाली. यास कमित कमी ६ हजार, तर जास्तीत जास्त १३ हजार ३०० रुपये दर मिळाला. प्रती क्विंटल दर सरासरी ९०५० रुपये होता. निजामाबाद परपेठ हळदीची ६ हजार ७३८ पोती विक्री झाली, तर कमाल ४ हजार, तर किमान ८ हजार दर होता. दराची सरासरी ६ हजार रुपयांपर्यंत होती. 

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय