शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, गुजरात राज्यातून सांगली जिल्ह्यात गुटख्याची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 15:18 IST

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दिल्ली, गुजरातमधून गुटख्याची तस्करी होत आहे. माव्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू नजीकच्या कर्नाटक राज्यातून आयात केली जात आहे.

सचिन लाड 

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दिल्ली, गुजरातमधून गुटख्याची तस्करी होत आहे. माव्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू नजीकच्या कर्नाटक राज्यातून आयात केली जात आहे. तस्करीत मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांची टोळी सक्रीय आहे. अन्न व औषध प्रशासन विभागासमोर ही तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली. गुटखा बंदीचे पान दुकानदारांनीही स्वागत केले. गुटखा बंदीमुळे माव्याला मागणी वाढली. 

माव्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूचा काळाबाजार सुरु झाला. पाच रुपयाला मिळणाऱ्या माव्याचा दर तीस रुपयांच्या घरात गेला. बंदी असूनही त्याची तस्करी केली जात आहे. कर्नाटकातून या तंबाखूची आयात केली जात आहे. गुजरात व दिल्लीतून गुटख्याची तस्करी होत आहे. बंदीच्या नावाखाली दुप्पट दराने त्याची विक्री होत आहे. यामध्ये व्यापारी व दुकानदार मालामाल होत आहेत. पाळेमुळे खणून काढण्यात अपयश

जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्याची कारवाई होत आहे. कधी पोलीस, तर कधी अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई होते. गुटखा, तंबाखूचा साठा जप्त केला होता. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. तपासाचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत. तपासात त्यांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे तपास पुढे सरकत नाही. कायद्यातील त्रुटींचा आधार घेऊन संशयित जामिनावर बाहेर येतात. ते पुन्हा तस्करी सुरू करतात. तस्करीची पाळेमुळे खणून काढण्यात अपयश येत असल्याने वर्षानुवर्षे हा प्रकार आहे.  

 

टॅग्स :SangliसांगलीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग