शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी नागरिकांना दिलासा : रेडिरेकनरच्या २५ टक्केच नजराणा भरावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:55 IST

State Government Home Sangli : गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांना रेडिरेकनरच्या २५ टक्के नजराणा भरुन भोगवटादार २ वरुन भोगवटादार १ होण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयाने हजारो गुंठेवारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती गुंठेवारी संघर्ष समितीचे चंदन चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देगुंठेवारी नागरिकांना शासन निर्णयाने दिलासा : चंदन चव्हाण रेडिरेकनरच्या २५ टक्केच नजराणा भरावा लागणार

सांगली : गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांना रेडिरेकनरच्या २५ टक्के नजराणा भरुन भोगवटादार २ वरुन भोगवटादार १ होण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयाने हजारो गुंठेवारी नागरिकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती गुंठेवारी संघर्ष समितीचे चंदन चव्हाण यांनी दिली.प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बाजार मुल्याच्या ७५ टक्के नजराणा २५ टक्के करावा व ७५ टक्केच्या सक्तीच्या नोटिसा मागे घ्याव्यात, यासाठी सर्वात प्रथम सांगलीत मोठे आंदोलन गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले होते. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर सरकारला त्याची दखल घेण्यास भाग पाडले.रेडिरेकनरच्या २५ टक्के नजराणा भरून त्यांचा वर्ग १ मध्ये समाविष्ठ करण्याचा शासन आदेश पारित झाला होता. मात्र उद्धव ठाकरे सरकार आल्यावर या आदेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने दि ३० डिसेंबर २०२० रोजी निर्णयास स्थगिती आली होती. यामुळे लाखो लोकांचे प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडले होते.

गुंठेवारी समितीने राज्य सरकारकडे गुंठेवारी विकास अधिनियम २००१ च्या कायद्यात वाढ करावी यासाठी पाठपुरावा केला होता. तो निर्णय २०२० अखेर सरकारने वाढवला महाराष्ट्रात मोठा न्याय गुंठेवारी नागरिकांना मिळवून दिला म्हणून शासनाच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीचा सत्कार केला होता. त्यावेळी समितीने २५ नजराणा रकमेचा प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत निवेदन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने आज कायद्यात रूपांतर झाले आहे .आता राज्यातील शहरी भागातील भोगवटादार २ च्या जमिनीचे भोगवटादार १ मध्ये रूपांतर करण्यासाठी संबंधित महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांचे जागेचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना शासनाची २५ टक्के नजराणा भरण्यासाठी मंजुरी मिळणार आहे. शिवाय ज्यांना पालिकेचे प्रमाणपत्र नाही अशांना मात्र ५० टक्के नजराणा भरावा लागेल. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारHomeघरSangliसांगली