शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

गुढीपाडवा सुनासुना; ८६ कोटींचा फटका  : व्यावसायिक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 17:54 IST

Gudhipadwa Sangli : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती वस्तू खरेदी करण्याची परंपरा कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झाली आहे. कोरोनापूर्वीच्या गुढीपाडव्याशी तुलना करता यंदा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांना एकूण ८६.५० कोटींचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देगुढीपाडवा सुनासुना; ८६ कोटींचा फटका  : व्यावसायिक अडचणी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सराफ बाजाराला सलग दोन वर्षे कोरोनाचा दणका

सांगली : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती वस्तू खरेदी करण्याची परंपरा कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झाली आहे. कोरोनापूर्वीच्या गुढीपाडव्याशी तुलना करता यंदा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांना एकूण ८६.५० कोटींचा फटका बसला आहे.जिल्ह्यात दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सराफ, घरबांधणी व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून यादिवशी नव्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या परंपरेला कोरोनाने धक्का दिला आहे. वाहन क्षेत्र वगळता सराफ व इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय यंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे.

वाहन क्षेत्रातही फारसा उत्साह दिसून आला नाही. दुचाकीच्या पाडव्याच्या विक्रीत ८० टक्के, तर चारचाकीच्या विक्रीत ५० ते ६० टक्के घट दिसून आली. बुकिंग केलेली वाहने देण्यासही व्यावसायिकांना अडचणी आल्या. वाहनांची उपलब्धताही झाली नसल्यानेही फटका बसला आहे.गुढीपाडवा सुनासुना जाण्याची चौथी वेळसराफ व्यावसायिकांचा गुढीपाडव्याचा सण सुनासुना जाण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी १९९६-९७ मध्ये नगरपालिकेचा जकात ठेका रद्द करावा म्हणून सांगलीतील दुकाने ८ ते १० दिवस बंद होती. त्या काळातच गुढीपाडवा होता. त्यानंतर २०१६ मध्ये सोन्यावर अबकारी कर लागला होता. त्याविरोधात भारतातील सर्व सराफ, सुवर्णकार, गलाई दुकानदार यांनी ४२ दिवस बंद पाळला होता. तेव्हासुद्धा गुढीपाडवा होता. आता कोरोनासारख्या आपत्तीने सलग दोन वर्षे गुढीपाडवा सण सुनासुना गेला आहे.कोणत्या क्षेत्राचे किती नुकसान

  • दुचाकी विक्री १४.५० कोटी
  • चारचाकी विक्री ३६ कोटी
  • इलेक्ट्रॉनिक्स वस्तू २२ कोटी
  • सराफ बाजार १४ कोटी
  • एकूण ८६.५० कोटी

दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीस यंदाही मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षांतील हे नुकसान चिंताजनक आहे. तरीही मागच्या वर्षीचा विचार केल्यास परिस्थिती बरी म्हणावी अशीच वाटते.-श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक मोटर्सइलेक्ट्रॉनिक्स व्यावसायाला गुढीपाडव्यादिवशी सुमारे २२ ते २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दुकानेच बंद असल्याने मुहूर्तावरील खरेदी थांबली. दोन वर्षे ही परिस्थिती असल्याने व्यावसायिकांचा विचार शासनाने करायला हवा.- विजय लड्डा,इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक, सांगलीगुढीपाडव्याला होणारी उलाढाल थांबल्याने मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायात नव्याने कर्ज काढून आलेले व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. दुकाने बंद असली तरी देणी सुरूच आहेत.- पंढरीनाथ माने,सचिव, सांगली सराफ समिती

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाSangliसांगलीMarketबाजार