शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Sangli News: मिरजेत भाजपमधील गटबाजी उफाळली, पालकमंत्री समर्थकांत दुफळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 17:02 IST

दुफळीमुळे आगामी महापालिकेसह इतर निवडणुका भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे

सदानंद औंधे

मिरज : आगामी लोकसभा विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे समर्थकांत गटबाजी उफाळली आहे. पालकमंत्री खाडे यांचे पुत्र राजकीय वारसदार म्हणून सक्रिय झाले आहेत. त्यामुळे खाडे यांचे स्वीय सहायक मोहन वनखंडे यांनी वेगळी चूल थाटण्याची तयारी सुरू केली आहे. दोन गटांच्या स्वतंत्र दहीहंडीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन होणार आहे.जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी असताना आता मिरजेत पालकमंत्र्यांच्या समर्थकांतही दुफळी निर्माण झाली आहे. पालकमंत्री खाडे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन करणारे स्वीय सहायक व भाजप अनुसूचित जाती- जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे हे खाडे यांचे पुत्र सुशांत खाडे यांच्या राजकीय प्रवेशामुळे उपेक्षित आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सुशांत खाडे यांच्या सत्कार कार्यक्रमास अनुपस्थित प्रा. वनखंडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. सुशांत यांच्याकडेच सत्तेच्या चाव्या देण्याच्या मागणीमुळे संघर्ष वाढला आहे.पालकमंत्री समर्थकांत दोन गट पडले आहेत. नाराज वनखंडे यांनी दहीहंडीनिमित्त ताकद दाखवण्याचे ठरवले आहे. जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या सोबत वनखंडे यांनी महायुतीच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे, तर सुशांत यांनी भाजपतर्फे स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन केले आहे. परस्परांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न आहेत. दुफळीमुळे आगामी महापालिकेसह इतर निवडणुका भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.

वनखंडे गटाची मोर्चेबांधणी-आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मित्रपक्षांची किंमत वाढली आहे. जनसुराज्य शक्तीकडून मिरज मतदारसंघाची मागणी करण्यात येणार आहे. जनसुराज्य शक्तीला जागा सोडल्यास वनखंडे यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. वनखंडे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. वनखंडे यांच्या पत्नी अनिता वनखंडे महापालिकेतील माजी समाजकल्याण सभापती आहेत. वनखंडे यांच्या गटाने निवडणुकीच्या तयारीसाठी डावपेच आखले आहेत. त्यामुळे खाडे गटाची अडचण होणार आहे.

शह-काटशहसुरेश खाडे युवा मंचतर्फे ११ सप्टेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रमाच्या जाहिरातीत प्रा. वनखंडे यांचे छायाचित्र टाळले आहे. विरोधी गटाच्या दहीहंडी कार्यक्रमात सुरेश खाडे यांचे छायाचित्र जाहिरातीत वगळण्यात आले आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी महायुतीच्या दहीहंडीत वनखंडे, जनसुराज्यचे समित कदम, भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliticsराजकारण