शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात नऊ कोटींची ‘जीएसटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:29 IST

जिल्ह्यातील जीएसटी विभागाकडे नोंदणी असलेल्या २६ हजारपैकी तीस टक्के व्यावसायिकांनी विवरणपत्रे दाखल केलेली नाहीत. विवरणपत्रे दाखल न करता सुमारे नऊ कोटींची कर चुकवेगिरी करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांना जीएसटी विभागाने नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत.

ठळक मुद्देचौकशीला गती : संबंधितांना नोंदणी रद्दच्या नोटिसाचुकवेगिरी

मिरज : जिल्ह्यातील जीएसटी विभागाकडे नोंदणी असलेल्या २६ हजारपैकी तीस टक्के व्यावसायिकांनी विवरणपत्रे दाखल केलेली नाहीत. विवरणपत्रे दाखल न करता सुमारे नऊ कोटींची कर चुकवेगिरी करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांना जीएसटी विभागाने नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत.केंद्रीय जीएसटी सांगली विभागाकडे २६ हजार वस्तू व सेवा पुरवठादारांची नोंदणी आहे, मात्र यापैकी सुमारे ७ हजार व्यावसायिकांनी विवरणपत्र दाखल न करता कर चुकवेगिरी केल्याचे उघड झाले आहे.

संबंधित व्यावसायिकांची जीएसटी नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या असून, त्यांच्याकडून १५ टक्के दंड व २४ टक्के व्याजासह थकीत जीएसटी कराची वसुली करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सुमारे साडेतीन कोटीची थकीत कर वसुली झाली आहे. जिल्ह्यात सुमारे नऊशे कोटी रुपये जीएसटी कर संकलनाचे उद्दिष्ट असून, यापैकी केंद्रीय जीएसटी विभागाकडे दोनशे पन्नास कोटी रुपये करसंकलन होते. विवरणपत्रे दाखल न करता कर चुकवेगिरीप्रमाणेच बोगस बिलांद्वारे जीएसटी कर बुडविण्याचा प्रकारही उघडकीस येत आहे. पनवेल येथील मोक्ष अलॉयज् यासह अन्य कंपन्यांना सांगलीतील एका उद्योगाकडून घेतलेल्या बोगस बिलांच्याआधारे कोट्यवधी रुपयांचा कर परतावा घेतला आहे. याप्रकरणी सांगलीतील संबंधित उद्योगाचीही चौकशी करण्यात येत आहे. राज्य जीएसटी विभागाने ही विवरणपत्रे दाखल न करता कर चुकवेगिरी करणाऱ्या नोंदणीकृत व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे.जीएसटी संकलन वाढलेवस्तू व सेवा कराच्या वसुलीद्वारे कर संकलनात सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कर न भरलेल्या ३० टक्के व्यावसायिकांकडून दंडात्मक कारवाईसह करवसुली झाल्यानंतर महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ५० हजारपेक्षा जादा किमतीच्या मालवाहतुकीसाठी ई-वे बिलाची तपासणी करण्यात येत आहे. 

वसंतदादा, माणगंगा कारखान्यांना नोटीसवसंतदादा व माणगंगा या साखर कारखान्यांनाही जीएसटी विवरणपत्रे भरली नसल्याने नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. 

हळद, गूळ, बेदाण्याची वसुली सुरूचसांगली मार्केट यार्डात हळद, गूळ व बेदाण्याच्या सुमारे १०० व्यापाऱ्यांना मागील पाच वर्षांच्या थकीत सेवा कर वसुलीच्या नोटिसा जीएसटी विभागाने दिल्या आहेत. या कारवाईविरोधात गेल्या महिन्यात व्यापाºयांनी बंद आंदोलन केले होते. खासदार राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतरही थकीत कर वसुलीचे काम थांबलेले नाही. १ फेब्रुवारीपासून पुन्हा थकीत सेवा कर वसुली सुरू करण्यात आली असून, आणखी काही व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत.

टॅग्स :GSTजीएसटीSangliसांगली