कवठेमहांकाळ : मराठी साहित्य विश्वातील ग्रामीण कथाकार चारुतासागर यांना त्यांच्या मळणगाव या जन्मगावी अकराव्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
मराठी साहित्य विश्वातील ‘नागीण’, ‘नदीपार’ व ‘मामाचा वाडा’ या अजरामर कलाकृतींचे साहित्यिक चारुतासागर उर्फ दिनकर दत्तात्रय भोसले (गुरुजी) यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या घरी व ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेसचे सरचिटणीस जनाब अल्लाबक्ष मुल्ला, आरुष कन्ट्रक्शनचे सुहास भोसले, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब भोसले, संजय भोसले, किरणराज पाटील, चारुतासागर सांस्कृतिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर, अशोकराव भोसले, विनोद पाटील यांच्यासह चिरंजीव राजेंद्र भोसले, चारुतासागर यांच्या पत्नी मीरा भोसले उपस्थित होत्या.