इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील पुतळ्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अमोल मिटकरी, युवा नेते प्रतीक पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शासकीय अधिकाऱ्यांनीही राजारामबापूंच्या पुतळ्यास आदरांजली अर्पण केली.
शासनाच्या वतीने प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी, तर बाजार समितीच्या वतीने सभापती अल्लाउद्दीन चौगुले, उपसभापती सुरेश गावडे यांनी राजारामबापूंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील, कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, म्हैसाळचे नेते मनोज शिंदे, बाळासाहेब होनमारे, जि. प. सदस्य शरद लाड, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते लालासाहेब यादव, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी, नगरसेवक संजय कोरे, शिवाजीराव माने, माजी सभापती दत्ताजी पाटील, सांगलीचे दिग्विजय सूर्यवंशी, पं.स. सभापती शुभांगी पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, नेताजीराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, विश्वासराव पाटील, डॉ. प्रताप पाटील, वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष एम.जी. पाटील, अरुण कांबळे, बाळासाहेब पाटील, भरत देशमुख, संजय पाटील, संग्राम पाटील, छाया पाटील, सुस्मिता जाधव, रोझा किणीकर, सुहास पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजी खराडे, सी.व्ही. पाटील, सर्जेराव देशमुख, देवराज देशमुख, संजय खवळे, डॉ. एन.टी. घट्टे, व्ही.डी. माने आदींनी राजारामबापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील तसेच संचालकांनी मान्यवरांचे स्वागत केले.
फोटो ओळी- १७०१२०२१-राजारामबापू पुण्यतिथी न्यूज
राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी आ. अमोल मिटकरी, पी.आर. पाटील, प्रतीक पाटील, अविनाश पाटील उपस्थित होते.