शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

सांगलीतील कोंगनोळीच्या ढवळे बंधूंची कमाल! द्राक्षाला मिळाला पाचशे एक दर 

By शरद जाधव | Updated: October 2, 2023 12:11 IST

हंगामातील पहिलेच द्राक्षे बाजारात दाखल

शरद जाधव सांगली : बदलते पाऊसमान, वातावरणातील चढउतारालाही आव्हान देत शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. असाच धाडसी प्रयोग कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी केला असून, यंदाच्या हंगामातील पहिली द्राक्षे त्यांनी बाजारात आणली आहेत. नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांनी उत्पादित केलेल्या द्राक्षांना प्रती चार किलो ५०१ रुपयांचा दर मिळवून त्यांनी बाजी मारली आहे. त्यांनी घेतलेल्या १० गुंठ्यांमध्ये सहा लाखांहून अधिकचे उत्पादन त्यांना मिळणार आहे.जिल्ह्यातील नियमित द्राक्ष हंगामास नोव्हेंबरपासून सुरुवात होते. एप्रिलपर्यंत जिल्हाभरातील द्राक्षे संपूर्ण देशासह परदेशातही जात असतात. मात्र, नियमित छाटणीपेक्षा आगाप छाटणी घेऊन सगळ्यात अगोदर द्राक्षे बाजारात आणणे खूप जोखमीचे काम असते. औषधांसह पिकासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, योग्य व्यवस्थापन आणि फळाची काळजी घेत काेंगनोळी येथील ढवळे यांनी द्राक्षे बाजारात आणली आहेत. जिल्ह्यातील ही पहिलीच द्राक्षे आहेत. दक्षिण भारतातील बाजारपेठेत ही द्राक्षे जाणार आहेत.

जूनमध्ये छाटणी आणि नियोजनढवळे यांनी ३० जून रोजी फळछाटणी घेतली होती. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचा माल बाजारपेठेत जाण्यासाठी तयार झाला आहे. रविवारी बेळंकी येथील व्यापाऱ्याने हा द्राक्षमाल खरेदी केला असून, तो चेन्नई, हैदराबाद बाजारपेठेत जाणार आहे.

दहा गुठ्यांत सहा लाखांचे उत्पादन५०१ रुपये प्रती चार किलो दर मिळालेल्या या द्राक्षबागेच्या प्लाॅटचे १० गुंठे क्षेत्र आहे. यातून ढवळे यांना सहा लाखांहून अधिकचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मध्येही त्यांनी याच प्लॉटमधून १० गुंठ्यांमध्ये पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.

शेतकऱ्यांच्या धाडसाला सलाम आणि दादवातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेणे आव्हानात्मक ठरत आहे. हेच आव्हान स्वीकारत ढवळे यांनी आगाप छाटणी तर घेतलीच शिवाय चांगले उत्पादन मिळवून दाखवले. ५०१ रुपयांचा दर मिळाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन करत प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले.

दराचा विक्रम जिल्ह्यातचगेल्याच आठवड्यात सांगाेला तालुक्यातील एका शेतकऱ्यानेही द्राक्षे बाजारात आणली. त्यांना ४५१ रुपयांचा दर मिळाला. मात्र, सांगली जिल्ह्यात सर्वांत प्रथम द्राक्षे आणि ५०१ रुपयांचा दर ढवळे यांना मिळाला आहे.

टॅग्स :Sangliसांगली