शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

द्राक्ष हंगाम सुरू! नको व्यापाऱ्यांचा सततचा गंडा; हवा रोखीच्या व्यवहाराचा फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:07 IST

तासगावच्या द्राक्षाची देशभर ख्याती असल्याने दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत देशभरातील अनेक व्यापारी तासगावात

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव तालुक्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष खरेदीसाठी देशभरातील व्यापारी  तालुक्यात दाखल झाले आहेत. गेल्या चार वर्षांत द्राक्ष खरेदी करून तालुक्यात तब्बल १३ कोटी ६१ लाख रुपयांना गंडा घालण्याचे काम काही व्यापाऱ्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस  प्रशासन दक्ष झाले आहे. व्यापाऱ्यांना नोंदी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.गावपातळीवरदेखील व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश सरपंच आणि पोलिस पाटलांना दिले आहेत. मात्र तरीही व्यापाऱ्यांचा गंडा टाळायचा असेल, तर द्राक्ष विक्रीवेळी रोखीचा फंडा वापरणे आवश्यक आहे.तासगाव तालुक्यात द्राक्ष काढणी आणि निर्यातीच्या हंगामाने वेग पकडला आहे. तासगावच्या द्राक्षाची देशभर ख्याती असल्याने दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत देशभरातील अनेक व्यापारी तासगाव तालुक्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूस अपवाद वगळला, तर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक ही नेहमीचीच गोष्ट ठरत आहे.यावर्षी तासगाव पोलिस ठाण्याच्यावतीने तालुक्यात येणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम सुरू आहे. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी तालुक्यातील सरपंच आणि पोलिसपाटील यांना  गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. द्राक्ष व्यापारी, एजंट यांची बैठक घेऊन त्यांना सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.   साठ व्यापाऱ्यांच्या नोंदीद्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिस प्रशासनामार्फत व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. आत्तापर्यंत साठ व्यापाऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. यापैकी बहुतांश नोंदी स्वतः पोलिस प्रशासनाने माहिती घेऊन ठेवल्या आहेत. मात्र अपवाद वगळता द्राक्ष विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणतीच नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे सगळी भिस्त पोलिस प्रशासनावरच कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

व्यापारी, ट्रान्सपोर्ट, एजंट, पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन फसवणूक टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधित व्यापाऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आहे. गावपातळीवर ग्रामपंचायतींनी  व्यापाऱ्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीदेखील रोखीतच मालाची विक्री करायला हवी. द्राक्षाच्या बाबतीत फसवणूक टाळण्यासाठी पोलिस प्रशासन सर्व पातळीवरून प्रयत्नशील आहे. - भानुदास निंभोरे, पोलिस निरीक्षक, तासगाव.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी