शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: द्राक्षदर कोसळले, उत्पादक बेदाणा निर्मितीकडे वळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 12:11 IST

यंदा बेदाण्याचे उत्पादनही वाढणार

संजयकुमार चव्हाणमांजर्डे : तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगाम जोमात आहे. पण, बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. द्राक्षांचे पडलेले दर व व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल दिसून येत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन झाल्याने बेदाणा उत्पादनातही विक्रमी वाढ होणार असल्याचे चित्र आहे.आरवडे, मांजर्डे, पेड, विसापूर, सावळज, मणेराजुरी परिसरात काही द्राक्ष उत्पादकांनी स्वतः शेड तयार करून बेदाणा उत्पादन सुरू केले आहे. तर, काही शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातून मजुरी देऊन बेदाणा करून घेण्याची व्यवस्था केली आहे.वीस किलोमागे एक किलो सूट अशी शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारी पद्धत सुरू आहे. सुरुवातीला ४०० ते ४८० रुपये प्रतिपेटी असलेला भाव सध्या १०० ते १४० रुपयांपर्यंत घसरला आहे. या दराने उत्पादन खर्चसुद्धा हाती लागणार नाही. त्यामुळे बेदाणा निर्मितीस उत्पादक पसंती देत आहेत.तासगाव व सांगली येथे बाजार समितीच्या सौद्यात बेदाण्याला चांगला भाव मिळत आहे. शिवाय तेथे फसवणूक होत नाही. त्यामुळे द्राक्ष विक्री केल्यास आर्थिक फटका बसेल, अशी भीती असणारे शेतकरी बेदाण्याकडे वळत आहेत. तासगाव व सांगलीत समितीमार्फत आयोजित सौद्यांना देशभरातून व्यापारी येतात. सर्व आर्थिक व्यवहारांवर बाजार समितीचे नियंत्रण असते. तेथे फसवणूक होत नसून इच्छेनुसार बेदाणा विक्री होते. बेदाण्यास सध्या दरही चांगला असल्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बेदाण्यास किलोला ३० ते ३५ रुपये मजुरीतालुक्यातील शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीसाठी रॅक तयार केले आहेत. किलोला ३० ते ३५ रुपये मजुरी आकारून बेदाणा तयार करून दिला जात आहे. कवठेमहांकाळ, जत, मिरज या भागांतही बेदाणा उत्पादन वाढणार आहे. पुढील तीन महिने बेदाणा निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे तसेच उत्पादन जास्त असल्याने व बाजारात कमी मागणी असून दाक्षाचे दर घसरले आहेत. दर्जेदार द्राक्षे तयार केली तरच वाढीव दर व चांगले उत्पन्न मिळेल. -पृथ्वीराज पवार, द्राक्ष उत्पादक, मणेराजुरी.

टॅग्स :Sangliसांगली