शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

जालिहाळमध्ये ग्रामपंचायत बिनविरोधचा ‘सुवर्णमहोत्सव’

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

परंपरा जपली : सलग दहावी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध; राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व

संख : गावाचा विकास करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ५० वर्षांची परंपरा जपत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून जत तालुक्यातील जालिहाळ खुर्दच्या ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. राजकारणासाठी राजकारण, तर विकासासाठी ऐक्य जपत सलग १० वी निवडणूक बिनविरोध झाली आहे. जालिहाळ खुर्द कर्नाटक सीमेलगत जतपासून पूर्वेकडे २८ कि.मी. अंतरावरील गाव. लोकसंख्या अवघी १०४१. द्राक्षे, डाळिंब, बागायतदारांचे सधन गाव, बेदाणा उत्पादनात आघाडीवर. ग्रामपंचायतीची स्थापना १० नोव्हेंबर १९६५ रोजी झाली. सुरुवातीपासून गावात एकी असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याची वेळच आली नाही. विरोध म्हणजे गावामध्ये भाजप, काँग्रेस पक्षाचे गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायत, विकास सोसायटीची निवडणूक वगळता बाकीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने भाग घेतला जातो. १९९० पर्यंत गावाचे नेतृत्व श्रीमंत पाटील, बाबूराव चव्हाण, रामजी पाटील, निवृत्ती सूर्यवंशी, आप्पा शिंदे, सिदगोंडा पाटील या जाणत्या नेत्यांकडे होते. त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांच्या कालावधित गावाचा विकास झाला. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून प्राथमिक मराठी शाळेची इमारत उभारली आहे. १९९० नंतर गावाचे नेतृत्व तरुण पिढीकडे आले. माजी सरपंच कामाण्णा पाटील, माजी अध्यक्ष राजू डफळे सरकार, केरुबा बिराजदार, कुंडलिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालतो. ग्रामपंचायत निवडणूक, विकास सोसायटी निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथम गावामध्ये दवंडी दिली जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करतात. पंचांची निवड करतात. तरुण, सुशिक्षित, काम करण्याची आवड हे निकष ठेवून निवड केली जाते. लगेच त्याचवेळी सरपंच, उपसरपंचांची निवड केली जाते. कोणताही राजकीय गट यामध्ये राजकारण आणत नाही. तंटामुक्ती पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, इको व्हिलेज, असे पुरस्कार गावाला मिळाले आहेत. (वार्ताहर)उमदी.. पोलीस हद्दीतील शांतताप्रिय गावउमदी हे पोलीस हद्दीतील शेवटचे गाव आहे. गावामध्ये पंचायत भरवून न्यायनिवाडा केला जातो. आतापर्यंत एकही वाद न्यायालयापर्यंत गेलेला नाही. गावातील खटला नोंदीचे रजिस्टर कोरेच आहे. निवडणुकीवेळी गावात पोलीस येतात. गावात एकच गणपती बसविला जातो.महिलांना संधीपुरुषांबरोबर महिलांनाही संधी देण्यात आली आहे. यापूर्वी उपसरपंच म्हणून गंगवा कोळी, तुळसाबाई करपे यांनी काम पाहिले आहे. पहिल्या महिला सरपंच म्हणून यल्लव्वा प्रल्हाद पाटील यांनी काम पाहिले आहे. यावेळी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून इतिहासात प्रथमच शांता दादा जावीर यांना संधी मिळणार आहे..लोकांमध्ये द्वेष, राजकीय वैमनस्य राहत नाही. विकासामध्ये राजकारण होत नाही. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.- कामाण्णा पाटील, सरपंच५५ वर्षे निवडणूक बिनविरोध झाल्याने गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. - राजू डफळे सरकार, उपसरपंच