शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कवठेएकंदच्या गुंडाकडून सांगलीत पिस्तूल हस्तगत-: दहशत माजविण्याचा उद्देश उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:13 IST

कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारा कवठेएकंद (ता. तासगाव) येथील गुंड सुहास सर्जेराव शिरतोडे (वय २७) यास अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिरतोडे याने हे पिस्तूल कोठून खरेदी केले, याबद्दल चौकशी करण्यात आली.

सांगली : कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारा कवठेएकंद (ता. तासगाव) येथील गुंड सुहास सर्जेराव शिरतोडे (वय २७) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगलीत आयकर भवनजवळ गुरुवारी दुपारी ही कारवाई केली. हे पिस्तूल त्याने तासगावमधील गुंड रोहित एकनाथ ऐवळे याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा हत्यार बाळगणाºयांवर, तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गुरुवारी शहरात गस्त घालत होते.

या पथकातील हवालदार बिरोबा नरळे यांना कवठेएकंदमधील गुंड सुहास शिरतोडे हा आयकर भवनजवळ कमरेला पिस्तूल लावून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एकशे दहा रुपये असा ५० हजार पाचशे दहा रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 

शिरतोडे याने हे पिस्तूल कोठून खरेदी केले, याबद्दल चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याने काही दिवसांपूर्वी तासगावमधील विटा नाका येथे राहणारा गुंड रोहित आवळे याच्याकडून ते खरेदी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी शिरतोडेसह आवळे याच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंभीर गुन्हे दाखल

अटकेतील गुंड शिरतोडे व त्याचा साथीदार ऐवळे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी असे दोन गुन्हे सांगली ग्रामीण पोलिसात नोंद आहेत. ऐवळे याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तासगावला रवाना करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी