शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

शासकीय आरोग्य सेवा खासगी करण्याकडे सरकारचा कल--नितीन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 8:20 PM

सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचा सर्वाधिक कल आहे.

ठळक मुद्देसरकारी यंत्रणा वाचविण्यासाठी सर्वांनीच एकत्र काम करण्याची गरजया संस्था ग्रामीण जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी,

सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचासर्वाधिक कल आहे. थोड्याच दिवसात शासकीय आरोग्य केंद्राचेही खासगीकरणहोणार असून, तो धोका लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी आणि शासकीय यंत्रणेनेकाम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साथी संस्था राज्य समन्वयक डॉ.नितीन जाधव यांनी केले. तसेच शासकीय यंत्रणांचे वेगाने होणारे खासगीकरणरोखण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी एकत्र काम करण्याचीगरज आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख वनियोजनाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषद येथे शनिवारी झाली.यावेळी डॉ. नितीन जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामहंकारे, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. डी. आर. पाटील,उज्वला मोट्रे, संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेचे डॉ. शशिकांतमाने, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे विनायक कुलकर्णी हे प्रमुखउपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारचे सध्या सरकारी संस्था बंदकरून त्या खासगी संस्थांकडे चालविण्यास देण्याचे धोरण आहे. केंद्रसरकारने महिला व बालकल्याण विभागाची अंदाजपत्रकातील तरतूद ६२ टक्के कमीकेली आहे. हीच परिस्थिती आरोग्य विभागाची आहे. मेघालयात शासकीय आरोग्यकेंद्रे सामाजिक संस्थांकडे चालविण्यास दिली आहेत. मेघालयातील धोरणमहाराष्ट्रात येण्यास वेळ लागणार नाही. म्हणून वेळीच जागे होण्याची गरजआहे. शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी सर्वसामान्य जनतेलाउत्तम सेवा दिली पाहिजे. शासनाच्या योजनांचा जनतेला लाभ झाला पाहिजे, याउद्देशानेच साथी, संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आरोग्यसेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजनाचे काम करीत आहेत. या संस्था ग्रामीणजनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठीच काम करीत आहेत. याचा अर्थशासकीय यंत्रणेला टार्गेट करणे आणि त्रास देणे हा आमचा उद्देश नाही.जिल्ह्यात ९० टक्के डॉक्टर चांगले काम करत असूनही केवळ १० टक्केडॉक्टरांमुळे शासकीय आरोग्य सेवा बदनाम होते. ते थांबवायचे आहे.डॉक्टरांच्याही काही समस्या असून, त्या आम्ही शासनाकडे मांडूनसोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे. आरोग्यकेंद्रात राहण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या प्रश्नालाही आम्हीवाचा फोडणार आहे.

पण, सर्व मूलभूत सुविधा असतानाही, रुग्णाला चांगल्या सेवा मिळत नसतील,डॉक्टरांचा काही गैरकारभार सुरू असेल तर, त्यांनाही आम्ही पाठीशी घालणारनाही. योग्यवेळी जनतेच्या रेट्याने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आम्हीपुढाकार घेणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.संग्राम संस्थेचे शशिकांत माने यांनी संग्राम संस्थेकडून चालत असलेल्याकामकाजाची माहिती दिली. एड्सग्रस्त व्यक्तींना उत्तम दर्जाची वैद्यकीयसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एड्सविषयी जनजागृतीचीमोहीम राबविली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संग्राम संस्थेचे सुलभा होवाळ, यशोदा न्यायनीत, संगीताभिंगारदिवे, अपर्णा मुजमले, भारती भोसले, नजरीया जहिदा पखाली, शबनमअत्तार, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे ज्ञानू कांबळे, सिंधुताई लोंढे,प्रशांत लोंढे, साथी संस्थेचे शकुंतला भालेराव आदी उपस्थित होते.डॉक्टरांनी नकारात्मक भूमिका बाजूला ठेवावी : पाटीलप्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी लोकाधारित देखरेख व नियोजनसमितीची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. डॉक्टरांनी शासकीय आदेशाचेकाटेकोर पालन करूनच औषध खरेदी आणि शासनाच्या योजना राबविण्याची गरज आहे.आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णाला सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. नकारात्मक भूमिका बाजूलाठेवून सकारात्मक गोष्टीचा विचार करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीयअधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी केले.लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकट करा : डॉ. हंकारेप्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.काही ठिकाणी उणिवा असतील तेथे लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकटकरण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. काही ठिकाणीलोकप्रतिनिधी व अन्य घटकांचा नाहक त्रास होतो. काही डॉक्टरांचे चांगलेकाम असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींचे हितसंबंध दुखावल्यामुळे त्यांनात्रास दिला जातो. या गोष्टीही थांबल्या पाहिजेत, असे मत जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. राम हंकारे यांनी व्यक्त केले.डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे काही ठिकाणी अडचण : गिरीगोसावीजिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.यामुळे तेथे तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी आहेत. तरीही साथी,संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थांच्या माध्यमातून ग्रामीणजनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे मत डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी व्यक्त केले.