शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेध, सरकार बदला घेईल : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:54 IST

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देअतिरेकी हल्ल्याचा भाजपकडून तीव्र निषेधसर्जिकल स्ट्राईक करून सरकार बदला घेईल : देशमुख

सांगली : काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा केंद्र सरकार निश्चित बदला घेईल. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी भावना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दरम्यान, या हल्ल्याचा भाजपच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला.आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला भ्याड आहे. याचा भाजप तीव्र निषेध करत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भाजपसह देशातील सर्व नागरिक आहेत. या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा बदला सरकार घेईल.

आ. सुधीर गाडगीळ म्हणाले, पुलवामा येथे जवानांवर झालेला हल्ला निषेधार्र्ह आहे. या भ्याड हल्ल्याचा बदला सरकारने घ्यावा. पाकिस्तान थेट युध्दात भारताला हरवू शकत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे अशाप्रकारे भ्याड हल्ले करून भारतीय सैनिकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या पाठिंब्याने सुरू आहे. याला भारत चोख उत्तर देईल.महापौर संगीता खोत म्हणाल्या, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. या हल्ल्याचा निषेध करत आहे. प्रकाश बिरजे म्हणाले, भारताला युध्दात पाकिस्तान हरवू शकत नाही. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना पाकिस्तान पाठिंबा देऊन भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्जिकल स्ट्राईक करून मोदी सरकार या हल्ल्याचा बदला घेईल.

यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक शेखर इनामदार, विजय घाडगे, भारती दिगडे, सुब्राव मद्रासी, स्वाती शिंदे, प्रकाश बिरजे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSangliसांगलीBJPभाजपा